छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या (सामाजिक न्याय दिन) पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात सामाजिक अर्थसहाय्य योजनेची बैठक
देवणी / प्रतिनिधी : येथे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या (सामाजिक न्याय दिन) पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात गुरुवारी (ता.25) सामाजिक अर्थसहाय्य योजनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुरेश घोळवे हे होते. मागील अनेक दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व त्यामुळे लाॅक डाऊन ची परिस्थिती यामुळे बैठक घेण्यात आलेली नव्हती. तसेच शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग परिपत्रक 12 मार्च 2020 अन्वये संगायो समिती बरखास्त झालेली आल्यामुळे व शासन निर्देशानुसार मा. जिल्हाधिकारी यांनी आदेशित केल्याप्रमाणे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्याचे निर्देश प्राप्त झालेले होते.
या वेळी सामाजिक अर्थसहाय्य योजनेसाठी प्राप्त झालेल्या 451 अर्जांची छाननी व कागदपत्रे पडताळणी करून संजय गांधी निराधार योजना 65 मंजूर व 9 नामंजूर, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना 61 व मंजूर 21 नामंजूर, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 216 मंजूर व 79 नामंजूर असे एकूण सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे 342 मंजूर 109 नामंजूर करण्यात आले.
या बैठकीस समितीतील शासकीय सदस्य म्हणून गटविकास अधिकारी मनोज राऊत, मुख्याधिकारी सुमित जाधव, सदस्य-सचिव नायब तहसीलदार सविता माडजे, अव्वल कारकून उर्मिला तिडके व ऑपरेटर प्रदीप कांबळे यांची उपस्थिती होती.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA

0 Comments