आदर्श मैत्रीचे स्मारक म्हणून गोपीनाथरावजी आणि विलासरावजीं यांचा एकत्रित पुतळा उभा राहावा.
लातुर / प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या दि. १६ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासरावजी देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी गोपीनाथरावजी मुंडे यांचा पुतळा उभा करण्याचा सर्वानुमते एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पुढारी यांनी मनःपूर्वक स्वागत करुन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्यासह उपाध्यक्ष, सर्व सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य या सर्वांचे हार्दिक अभिनंदन ही केले आहे.
विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे या दोघांची मैत्री सर्वांच्या साठीच एक आदर्श मैत्री आहे. यांच्या मैत्रीला कुठलीही बंधने अडवू शकले नाहीत. दो हंसो का जोडा राजकारणा बाहेरच्या अमृतमय मैत्रीचे प्रतीक म्हणूनच या जोडगोळी कडे पाहिले जाते. मैत्रीचे प्रतीकच नव्हे तर आदर्श मैत्रीचे स्मारक म्हणून या दोघांची वेगवेगळी पुतळे उभे करण्यापेक्षा दोघांचा एकत्रीत पुतळा उभा करावा. अतूट मैत्रीचा एक संदेश संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानला जाऊ शकतो. त्यादृष्टीने आपण या दोघांचा एकत्रित पुतळा उभा करावा. अशी पत्राद्वारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याकडे मागणी केली आहे. सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सन्माननीय सदस्य यांना विश्वासात घेऊन एकत्रित पुतळ्याचा निर्णय घ्यावा. आपल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागतच होईल एवढेच नव्हे तर या निर्णयाची गिनिज बुकात सुद्धा नोंद घेतली जाईल, असेही सर्व समाजातील लोकांनी भावना व्यक्त करीत आहेत.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA

0 Comments