नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका नर्सेस निवड यादीचे काय झाले..?
संबंधित नर्सेसना कामावर तात्काळ बोलवा
- आदी बनसोडे
युनायटेड नर्सेस असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
नांदेड / प्रतिनिधी : जिल्ह्यात व महानगरात कोरोनाचा नायनाट संपवण्यासाठी कोरोना विरुद्ध कोव्हिड योद्धे म्हणून दोन महिन्यांपूर्वी नर्सेसनी भरलेल्या फार्म मध्ये दोन महिन्यांत तिन लिस्ट लागले आहेत..त्यावर कुठलीही भरती प्रक्रिया अद्याप आम्हाला कळविले नाही, यामधील नर्सेस तुमच्या नौकरीची वाट बघुन औरंगाबाद सोलापूर ठाणे येथे कोव्हिड ड्युटीवर गेले आहेत.
पावसाळ्यात अनेक भयंकर आजार नागरिकांना नावे पण माहिती नसतील असे आजार डोके वर काढत आहेत काढतात व कोरोना संक्रमित होतात, साथरोगांचे आजार होतात, अपघात होतात, वादळी वाऱ्यामुळे आपत्ती घडते, अशा अनेक अडचणी आहेत त्यावर प्रतिबंध म्हणून नर्सेसची आपल्या पुर्ण जिल्हाभर कमतरता आहे हाॅस्पिटल मध्ये गरज आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महानगरपालिका अशा ठिकाणी नर्सेसची गरज आहे.. नर्सेसना कामावर बोलवुन आपला जिल्हा आजार मुक्त होऊ शकेल.. नर्सेस दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत लवकरात लवकर बोलवावे अन्यथा रेजीस्टेड नर्सेस नंतर मिळणार नाहीत, स्टुडंट्स घेऊन कामे करावी लागतील. आसा ईशारा ही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या निवेदनावर चव्हाण लवकुश, संदीप कोल्हे,रेखा पोटे, अमोल ढवळे, अशा शितळे, मिनाक्षी पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments