कल्याण येथे स्मार्ट सिटिच्या नावाने जनतेची स्मार्ट फसवणूक --- जिल्हा अध्यक्ष यज्ञकांत पाटिल

कल्याण / प्रतिनिधी : येथे स्मार्ट सिटिच्या नावाने जनतेची स्मार्ट फसवणूक केली जात आसल्याचे नॅशनल सोशालिस्ट पार्टीचे युवक ठाणे जिल्हा अध्यक्ष यज्ञकांत पाटिल यांनी के.डि.एम.सी.चे आयुक्त मा. विजय सूर्यवंशी साहेब यांना मागण्यांचे निवेदन देवून केली आहे. 
      महापालिकेच्या अंतर्गत येणारे रस्ते म्हणजे मृत्युचे सापळे झाले आहेत. म्हणजेच रस्त्यावरील खड्डे कल्याण डोंबीवली महानगरपालिकाच्या अंतर्गत लाॅकडाऊनच्या काळात रस्त्यावरिल काम संपल्या नंतर संबंधित कंत्राट दाराने रस्त्यावरिल उंचसखलपना,फ़्लेवर ब्लॉक बसून रस्त्याची लेवलिंग न केल्याने निर्माण झालेल पाथहोल ,खड्डे हे नागरिकांचे जीव घेण्याची कारण होत आहेत त्याचबरोबर
नेमून दिलेले काम वेळेत पूर्ण करुण संबंधित कंत्राटदारानी नागरिकांना त्रास होणार नाही आशी कुठलीही उपाय योजना आखली नाही. त्यासाठी रस्ते योग्य आसे करावे आणि जबाबदारी न घेणारे कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई  करण्यात यावी.स्मार्ट सिटिच्या या युगात रस्त्यावरच्या खड्ड्यांची समस्या संपण्याचं काही नाव घेत नाही.

     सध्या ठाणे,कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्ता कुठे सुरु होतो आणि खड्डा कुठे संपतो याचा अंदाजच प्रवाशांना येत नाही रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांनी उंटावरून सफर केल्याचा भास होतो आहे. 
नागरीकाच्या या गैरसोयीचे निराकरण तात्काळ करण्याची मागणी नैशनल सोशालिस्ट पार्टीचे मा.सुशांतभाऊ गोरवे युवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र,नसीब झाडे महाराष्ट्र मिडिया प्रमुख आदींनी निवेदनाद्वारे केले आहे.