एक रूपया पगार घेऊन छत्तीस वर्षे पोलीस खात्यात काम करणारा सच्चा राष्ट्रभक्त : मा.जावेद अहमद 

डॉ अब्दुल कलाम यांचेनंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळविले असे अधिकारी म्हणजे मा जावेद अहमद.  जावेदसाहेब 1980 च्या बॅचचे IPS अधिकारी.केवळ देशसेवा करायची म्हणून नोकरी करणारे. अहमदसाहेब मूळचे उत्तर प्रदेशातील नबाब घराण्यातील असून त्यांच्या घराण्यातील कोणी नोकरी करत नाहीत. आजही सर्वजन राजेशाही आयुष्य जगत आहेत. अब्जावधीच्या  संपत्तीचे ते मालक आहेत. अपवाद वडीलांचा कारण वडीलही (काझी मुख्तार अहमद) सेवानिवृत्त IAS अधिकारी होते.                       1980 मध्ये I P S होऊन नोकरीत हजर झाल्यानंतर आपण फक्त एक रूपया मासिक पगार घेऊन उर्वरित पगाराची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करायला सुरवात केली.36 वर्षे नोकरीतून सेवानिवृत्त होईपर्यंत हे व्रत पाळले.मा जावेदसाहेब यांनी सेवेत असताना खाजगी कामासाठी सरकारी गाडी कधीही वापरली नाही. खाजगी गाडी वापरत.
          मा जावेदसाहेब यांचा गणवेश जाड्याभरड्या खाकीचा असे. टेरिकॉटचा खाकी गणवेश त्यांनी कधीच परिधान केला नाही. साधेपणा हा सरांचा स्थायीभाव होता. म.गांधी यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता.
नवी मुंबईत पोलीस आयुक्त असताना सरांनी स्वत:चा मोबाईल सार्वजनीक केला होता. मोबाईलवर कोणीही बोलू शकत असे. समक्ष असणाऱ्यांचे कोणी ऐकून घेत नाहीत ही सार्वत्रिक परिस्थिती असताना सरांचे कौतुक वाटते. माणूसकीचा गहिवर सरांच्याकडे असल्यानेच हे शक्य झाले असावे.नवी मुंबई येथे असताना महिलांसाठी हेल्पलाईन सुरू केली. महिलांसाठीच्या हेल्पलाईनचे जनक म्हणून  मा.जावेदसाहेब यांना ओळखलं जाते.           
       दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेजातून सरांनी पदवी घेतली होती. सर डिसेंबर 2015 ला सेवानिवृत्त झाल्याबरोबर मा प्रधानमंत्री यांनी त्याची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. पोलीस खात्यातून निवृत्ती नंतर राजदूत होण्याचा बहुमान मा रिबेरोसरांचे नंतर  मिळविणारे केवळ दुसरे म्हणजे मा.जावेदसाहेब आहेत. पगार भरपूर असूनही भ्रष्टाचारी आपण बघतो. समाजाचं त्यांना काही देणं-घेणं नसतं. वेदना, व्याकुळता, करूणा पाहून त्यांच मन कधी व्याकूळ होत नाही. आपल्याचं मस्तीत धुंदीत ते वावरत असतात. लाज,लज्जा काही नसते. केवळ स्टेजवर राष्ट्रप्रेमाच्या गप्पा झोडून तत्त्वज्ञान ओकत असतात. आशा व्यक्तीमत्वास बि.टि.व्हि.न्यूज कडून त्यांच्या कार्यास सलाम..!!

      वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!

महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.


         BTV NEWS MAHARASHTRA