पत्रकारांनी प्रामाणिकपणे पत्रकारिता करून समाजपरिवर्तनासह देशहिताचे कार्य करावे..
-- वैद्यकीय अधिकारी डॉ पांडुरंग कलंबरकर
देवणी / प्रतिनिधी : जेथे सूर्याचे किरण जात नाहीत तेथे पत्रकाराची दृष्टी जाते आसा महत्त्वाचा घटक पत्रकार हा आसून लोकशाहीतील चौथा स्तंभाचा तो पाईक आहे. समाजपरिवर्तनाची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे ती जबाबदारी आपल्या देशातील पत्रकार प्रामाणिक पणे बजावीत आहेत म्हणून आपली लोकशाही सुरक्षित आहे म्हणून पत्रकारांनी आपल्या क्षेत्रांत प्रामाणिकपणे पत्रकारिता करून समाजपरिवर्तनासह देशहिताचे कार्य करावे असे मत बोरोळ येथे गुरुवारी (ता.१५) आयोजित "साप्ताहिक ज्ञान सूर्य " या वृत्तपत्र प्रकाशन प्रसंगी बोरोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ पांडुरंग कलंबरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केले.
डॉ कलंबरकर पुढे म्हणाले की देशाच्या सर्वांगीण विकासात सर्वात मोठे योगदान प्रत्रकाराचे राहिले आहे सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक अनेक प्रश्नावर वेळोवेळी प्रहार करून प्रशासनाच्या समोर आणून ते सोडविण्याचे कार्य प्रत्रकाराने केले असल्याने त्यांना सामाजिक बांधिलकी आहे सर्वसामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन त्यांचे प्रश्न सोडवणारा एकमेव घटक म्हणजे पत्रकार होय पत्रकारांचे काम हे साधारण काम नाही प्रा दिलीप शिंदे ही मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान आहे शिंदे यांनी लावलेले ज्ञानसूर्य हे वृत्तपत्र वटवृक्षासारखे मोठे होहो त्यांचे दैनिकात रुपरतार समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडण्याचे काम करीत राहवे आशा शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी जाकीर बागवान, एकमतचे प्रताप कोयले सकाळचे बालाजी टाळीकोटे, सा लोकवैभव चे संपादक गिरीधर,गायकवाड पत्रकार रणदिवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी टाळीकोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन साप्ताहिक ज्ञानसूर्यचे संपादक प्रा दिलीप शिंदे यांनी मानले या कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील बरेच कर्मचारी व इतर नागरिक ही उपस्थित होते.

0 Comments