सगरोळीत जनावरांना लसीकरण ; पशूधन निरोगी ठेवण्याचे क्रषि कन्या कडून पशूपालकांना मार्गदर्शन 

क्रषि विद्यापीठाचा क्रषि कार्यानुभव व क्रषिआधारित उद्योग उपक्रम

उदगीर (प्रतिनिधी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी आधारित उदयोग उपक्रम अंतर्गत क्रषी महाविद्यालय उदगीर येथील अंतिम वर्षातील कृषि कन्या शैलजा दमय्यावार यांनी बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे जनावरांना लसीकरण केले व गावातील शेतकरी पशूपालकांना मार्गदर्शन ही केले. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक आसणारा महत्त्वाचा घटक आज आनेक साथीच्या आजाराने ञस्त आसल्याने जनावरांच्या आरोग्यासाठी लसीकरणाची मोहीम आयोजीत करून पशूधनाचे आरोग्य अबाधीत राखण्यासाठी पशूपालकांनी उपाययोजना काय करावेत जेणेकरून शेतकरी व  पशूपालकांचे होणारे नूकसान टळेल व एकंदर शेती आणी शेतकरी सदैव प्रगतशील राहील. कृषि कन्या शैलजा दमय्यावार यांनी क्रषि क्षेत्रातील शिक्षण घेताना आपल्या भागातील शेतक-यांना कोणत्या समस्या उद्भवतात या वर उपाययोजना आखून सदर लसीकरण मोहीम राबवली त्यामुळे या भागातील शेतकरी व पशूपालकांनी आपल्या या क्रषि कन्येच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केली केले.
     या वेळी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी ता.बिलोली येथील पशुवैद्यक डॉ.निहाल अब्दुल गफार मुल्ला यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांसमोर प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले.त्याचबरोबर लसीकरण करण्या मागचे महत्व व फायदे शेतकऱ्यांसमोर मांडले . शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण करुन रोग मुक्त ठेवावे असे आवाहन या मोहिमेतून क्रषि कन्या शैलजा दम्मयावार यांनी केले आहे.