अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थीनींनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा.

नगरसेवक माजीद तांबोळी यांचे आवाहन.

देवणी / प्रतिनिधी : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय मान्यता प्राप्त मौलाना आजाद एज्युकेशन फाउंडेशनद्वारे अल्पसंख्यांक समाजातील मुलींना बेगम हजरत महल शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे.अल्पसंख्यांक समाजातील मुलींनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे नगरसेवक माजीद तांबोळी यांनी केले आहे.मुस्लीम,बौद्ध,शिख,पारशी,जैन व ख्रिश्चन समाजातील मुलींना शिक्षणासाठी आर्थीक मदत म्हणुन हजरत महल शिष्यवृत्ती दिली जाते.
ईयत्ता 9 वी ते 12 वी वर्गात शिकणार्‍या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते.या शिष्यवृत्ती अंतर्गत इ.9 वी व इ.10 वी वर्गात शिकणार्‍या विद्यार्थीनींना वार्षीक 5000 रुपये तसेच इ.11 वी व इ.12 वीत शिकणार्‍या विद्यार्थीनींना 6000 रुपयांची आर्थीक मदत दिली जाते.
शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे.अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 आॅक्टोबर 2020 आहे.अर्ज दाखल करण्यासाठी http://bhmnsmaef.org/maefwebsite/ या संकेत स्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळेच्या मुख्याध्यपकांशी संपर्क साधावा.
अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अल्पसंख्यांक समाज कार्यकर्ते तथा देवणी नगरपंचायतचे नगरसेवक माजीद तांबोळी यांनी केले आहे.