अवैद्य देशी दारू बंद नाही झाली तर आंदोलन करण्याचा युवकांनी दिला इशारा

देवणी / प्रतिनिधी : तळेगाव भो येथे अवैद्य देशी दारू विक्री होत आहे या विरोधात दिनांक 9/10/20रोजी  गावातील युवकानी एकञ येऊन गावालाती अवैद्य देशी दारू बंद करण्यासाठी घेतला पुढाकार अवैद्य धंदेवाले युवकांना अरे तुरीची भाषा वापरत आहेत आणि हे अवैद्य देशी दारू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये विक्री होत आहे त्याविरोधात गावातील युवकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालय तहसीलदार कार्यालय देवणी पोलिस स्टेशन देवणी सार्वजनिक बांधकाम विभाग देवणी येथे निवेदन दिले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यानी येत्या चार दिवसात कारवाई केली नाही तर गावातील युवक महिला यांच्या वतीने तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असे आव्हान केले आहे. 
     या निवेदनावर अनेक युवकांनी स्वाक्षरी केली आहे तंटामुक्ती अध्यक्ष  बालाजी जाधव  सरपंच  सौ रेखा संग्राम कोरे ,सदस्य  ज्ञानोबा  विळेगावे,  ग्रामपंचायत सदस्य  गजराबाई कांबळे, तुकाराम मानकेश्वरी, गणेश हेडंबे , रेणुके राहुल, दत्ता बिरादार, महादेव कोटे, विकास बिरादार, कृष्णा इंगोले ,पोतदार  रोहित, कृष्णा पाटील, आदी युवकांनी स्वाक्षरी केली आहे.