आ.संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या प्रयत्नामूळे धनेगांव उच्चस्तरीय बंधार्‍यावरील विद्युत वाहिनी  स्थंलातर करण्यासाठी  ९३. ६२लक्ष मंजुर - सभापती सौ चिञकला बिरादार

देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील मौजे धनेगांव येथील धनेगांव उच्च पातळी बंधारा 2020  मध्ये  पुर्ण शमतेने 100% पाणी थांबले आहे ,त्यामुळे धनेगांव व हेंळब या गावातील पाणीपुरवठा करणार्‍या विहीरी व शेतकरी बांधवाना महावितरणीच्या वतीने विद्युत पुरवठा करण्यात येत होता पण या वर्षी पुर्ण शमतेने पाणी थांबल्यामूळे सर्व विद्युत वाहिनी करणारे ,रोहीञ व विद्युत वाहिनी करणारे पोल हे आज पुर्ण पाण्याखाली गेले असल्यामूळे  पाणी पुरवठा बंद आहे, बुडीत क्षैञात गेलेली ,त्यामुळे  विहीर ,जलशुध्दिकरण यंञ 
 नवीन विद्युत वाहिनी ,रोहिञ यासाठी निधी मिळवा म्हणुन
देवणी पंचायत समितीचे सभापती सौ चिञकला धनाजी बिरादार व भाजयुमो तालुका अध्यक्ष युवा नेते श्री रामलिंग शेरे यांनी आ.संभाजीराव पाटील निंलगेकर साहेबांकडे सतत पाठपुरवठा केला आहे त्याची मागणी लक्षात घेवुन आमदार संभाजीराव पाटील निंलगेकर साहेबांनी संबधित विभागाच्या अधिकार्‍याना याबाबत सुचना व पाठपुरवठा केल्यामुळे  धनेगांव उच्च स्तरीय बंधार्‍यावरील नवीन विद्युत कनेश्कनसाठी ६५  लक्ष व व विद्युत वाहिनी स्थंलातर करण्यासाठी  २८.६२ लक्ष हा निधी  महावितरणकडे वर्ग करण्यात  येत आहे  ,येत्या आठ दिवसात ते पैसे महावितरण कडे वर्ग करण्यात येणार आहेत 
यामूळे लवकरच विद्युत वाहिनी व रोहीञाचे काम पुर्ण होवून हेंळब व धनेगांव या  दोन्ही गावातील शेतकरी बांधव व ग्रामस्थानां याचा फायदा होणार आहे व विचेचा प्रश्न मिटणार आहे,  व  लवकरच हेंळब धनेगांव  वळसांगवी या गावातील बुडीत क्षैञात गेलेल्या विहीरीना मंजूरी मिळणार आहे व   तिन्ही  गावातील शेतकरी व ग्रामस्थाच्या वतीने आमदार संभाजीराव पाटील निंलगेकर याचे आभार मानन्यात आले असे  भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे यांनी सागिंतले.