मौजे धनेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबियाच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रु आर्थीक मदत

देवणी / प्रतिनिधी :  धनेगांव येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मयत खातेदार कै सतीश प्रभू बिरादार यांच्या वारस पत्नी जयश्री सतीश बिरादार व दुसरे मयत शेतकरी खातेदार कै अशोक आण्णाराव अवलकुंडे यांच्या या वारस पत्नी जनाबाई अशोक अवलकुंडे यांना शासनाकडून प्रत्येकी एक लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये 30,000 रुपये धनादेश त्यांना प्रत्यक्षरीत्या  मा तहसिलदार श्री सुरेशजी घोळवे यांच्या हस्ते देण्यात आला व प्रत्येकी 70,000 रुपयांचा धनादेश त्यांची नावे मासिक प्राप्ती योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देवणी यांच्याकडे पाठविण्यात आला. यावेळी  भाजयुमो तालुका अध्यक्ष  श्री रामलिंग शेरे, श्री बाळासाहेब बिरादार ,तलाठी श्री ननावरे सर पोलीस पाटील श्री बंकट बोयणे हे उपस्थित होते.