राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांच्याकडून कांबळे कुटुंबियांचे सांत्वन...

देवणी / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल कांबळे यांचे वडील कालकथित साधुराम कांबळे यांचं दुःखद निधन झाले होते परंतु अंत्यविधीसाठी काही कारणास्तव येता न आल्याने बांधकाम व पाणीपुरवठा राज्यमंत्री ना. संजयभाऊ बनसोडे यांनी देवणी खुर्द येथे शनिवारी (ता.३) कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
     यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर,उदगीर पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव मुळे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.अनिल इंगोले,उदगीर काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील,इंजिनिअर विनायकआण्णा बगदूरे,काशीनाथ मानकरी,ज्ञानेश्वर पाटील,अनिल रोट्टे,सुभाष पाटील,वैजिनाथ लुल्ले,देविदास पतंगे,इंजिनिअर दिलीप नेत्रगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमरदिप बोरे,राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष संदीप पाटील,परमेश्वर बोरूळे,आदीजण उपस्थित होते.