विद्रोही पत्रकार डी.टी.आंबेगावे यांच्या दणक्यानंतर पत्रकारांच्या वडिलांवर तात्काळ सुरू केले उपचार !
रत्नागिरी / प्रतिनिधी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या दणक्यानंतर वर्धा जिल्ह्यात पत्रकारांच्या वडिलांवर डाॅक्टरांनी उपचार सुरू केले आहेत.चार दिवसापासून पत्रकारांचे वडील रूग्णालयामध्ये अॅडमिट आहेत पण डाॅक्टर लक्ष देत नसल्याने रूग्णांची तब्येत खालावत चालली होती. एका पत्रकारांनी माझ्याशी संपर्क साधून सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर व्यवस्थापनाकडे तात्काळ पाठपुरावा सुरू केला आणि लगेच पत्रकारांच्या वडिलांवर उपचार सुरू झाले. गेल्या चार दिवसापासून कधीच न फिरकलेले डाॅक्टर आॅक्सिजन पुरवत नव्हते, की उपचार करीत नव्हते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या दणक्यानंतर डाॅक्टरांना जाग आली आणि आता रूग्णासह रूग्णांच्या नातेवाईकांचीही काळजी घेत रूग्णावर योग्य उपचार करीत आहेत. पत्रकार किंवा त्यांचे नातेवाईक यापैकी कोणावरही योग्य उपचार केले जात नसतील तर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य ही संघटना कोणाचीही गय करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांवर वेळेवर उपचार होत नसतील तर डी.टी.आंबेगावे यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments