रक्ताचा तुटवडा झाल्याने जिवदान देण्यासाठी देवणीतील सामाजिक कार्यकर्ते रक्तदानासाठी सरसावले..
देवणी / प्रतिनिधी : कोरोनामुळे रक्त तुटवडा निर्माण झाला आसल्याने येथे शनिवारी (ता.03) रक्तदान शिबिर घेण्यात आले.या वेळी 61 राक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्ह्य़ातील सर्व रक्त पेढीमध्ये रक्ताची तुडवडा असल्याचे कळल्यानंतर देवणी येथील सामाजिक कार्यकर्ते मिळून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नागप्पा अंबरखाणे ब्लड बँक साठी रक्तदाते यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.
सर्व रक्तदात्यांनी योग्य वेळी रक्तदान केले आसल्याने नागप्पा अंबरखाने ब्लड बँक यांच्याकडून रमेश अंबरखाने यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक लुल्ले,विजयकुमार मानकरी,निलेश लांडगे ,वैजनाथ लुल्ले ,रमेश मनसुरे, मनोज लांडगे ,वैभव धनुरे, लखन जीवने ,सुनील चिद्रवार,राजकुमार चिद्रवार उमकांत संते, मल्लिकार्जुन ईश्वरशेट्टे,पाटील ईश्वर,राम रूपनरे आदींनी सहकार्य केले आहे.
0 Comments