जवळग्यात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची दुर्दशा
----------------------------------
बहुसंख्य लिंगायत समाज असूनही दुर्लक्ष
----------------------------------
देवणी / प्रतिनिधी (गिरीधर गायकवाड नागराळकर) :ज्या महापुरुषांने बाराव्या शतकात जातीयतेवर प्रहार करून समताधिष्ठित समाजव्यवस्था स्थापन करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले बहुजनांच्या उद्धारासाठी जीवनभर संघर्ष केला त्या बसवेश्वर महाराजांचा आदर्श नवीन पिढीला प्रेरणादायी ठरावा असा उद्देश ठेवून रामलिंग जावळगा येथे पुतळा उभारण्यातआला आहे परंतु या जवळग्यात बहुसंख्य लिंगायत समाज असतांना सुद्धा त्या लिंगायत समाजासाठी महत्त्वाचे कार्य महात्मा बसवेश्वर महाराजाने केले त्या जवळग्यातील महाराजांच्या पुतळ्याची पडझड झाली आहे लिंगायत समाजाला महात्मा बसवेश्वर महाराजांचा विसर पडला आहे काय ! महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा जीर्ण अवस्थेत मरणयातना भोगत आहे बहुसंख्य लिंगायत समाज असलेल्या जवळग्यात पुतळ्याची अवहेलना व्हवी ही लाजिरवाणी बाब आहे
महाराजांनी केवळ बहुजन उद्धारासाठी काम केले म्हणून त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का अशी शंका निर्माण केली जात आहे
महात्मा बसवेश्वर, तथागत गौतम बुद्ध, संत कबीर यांचा आदर्श संपूर्ण देशाने नव्हे तर जगाने स्वीकारला त्यांचेच विचार फुले शाहू आंबेडकरांनी पुढे चालून बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर व अडीच वर्षांपूर्वी चे बुद्धाचे तत्वज्ञान व कृतिशील बहुजनांचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांतून संपूर्ण जगात आदर्श ठरणारी समता स्वातंत्र बंधुता यांना प्रमाण मानणारी भारतीय राज्यघटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा बसवेश्वर महाराज, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद या महापुरुष यांची पुतळे आहेत देवणी तालुक्यातील महापुरुष यांच्या पुतळ्याचे गाव म्हणून त्यांची ओळख आहे
देवणी तालुक्यातील जि प सर्कल मधील सर्वधिक लोकसंख्या असलेले गाव आहे विध्यमान जि प सदस्य जवळग्याचेच प्रशांत पाटील माध्यमातून लाभले आहेत व निलंगा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील यांचे निकटवृत्ती आहेत निवडणूक पूर्वी किंवा निवडणूक जिंकली तेव्हा पुतळ्याला हार तुरे घातले नसतील का ? पुतळ्याची दुरवस्था त्यांना दिसली नाही का ? असा प्रश्न उपस्थित होतो ग्रामपंचायतीने तात्काळ अर्थिक तरतूद करून पुतळा बांधकाम व सुशोभिकरण करण्यात यावी पुतळ्याची कुचंबणा थांबवावी.
0 Comments