सांगली जिल्हा सरचिटणीस पदी आनंदराव हात्तेकर  
यांची निवड

सांगली / प्रतिनिधी : होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने सांगली जिल्हा बैठकीत संस्थापक अध्यक्ष मा.राजाराम ऐवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  होलार समाज समन्वय समितीचे नेते सिद्राम जावीर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली.
      या बैठकीमध्ये सांगली जिल्हा सरचिटणीस पदी मा आनंदराव हात्तेकर राहणार मिरज यांची निवड करण्यात आली.निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष मा राजाराम ऐवळे साहेब व होलार समाज समन्वय समितीचे नेते सिद्राम जावीर साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. 
       यावेळी रक्षक समितीचे अध्यक्ष राजुदादा गेजगे सांगली जिल्हा अध्यक्ष मा आनंदराव ऐवळे जिल्हा उपाध्यक्ष शरद हेगडे मिरज तालुका अध्यक्ष गणेश भजनावळे व राजाराम ऐवळे युवा शक्ती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.