देवणीत कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी फिरत्या व्हॕनचा प्रारंभ

देवणी / प्रतिनिधी : तालुक्यात कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी (ता.०५) फिरत्या व्हॕनचा प्रारंभ करण्यात आला. तालुक्यात कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन "माझे कुटुंब माझी जबाबदारी" हाती घेतले आहे.त्याची देवणी शहरातील मुर्गी चौक येथुन प्रारंभ करण्यात आला. 
        या उपक्रमाचा प्रारंभ देवणीचे सुप्रसिद्ध डाॕ संजय घोरपडे यांच्या हास्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे,गटविकास अधिकारी मनोज राऊत,नगराध्यक्ष वैजनाथ आष्टुरे,उपनगराध्यक्ष सभापती अंजलीताई नागेश जिवणे,पोलिस कर्मचारी विनायक कांंबळे सह उपस्थित होते. 
       या अभियानांतर्गत फिरत्या व्हॕनच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोणा  प्रतिबंधात्मक उपाययोजनेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे तसेच नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे डाॕ संजय घोरपडे यांनी सांगितले.