विटाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे यांनी केली कलाकारांना मदत..
विटा / प्रतिनिधी : उपविभागीय पोलीस अधिकारी (dysp) विटा अंकुश इंगळे यांनी केली कलाकारांना मदत.. जीवनावश्यक वस्तूची केली मदत. पोलीस जनतेचे सेवक आहेतच तसेच शक्य त्या दुर्बल घटकास ते मदत करतात हे साहेबांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवले.. इंगळे साहेबांबद्दल या विभागात खूपच चांगले मत आहे. ते कर्तव्य दक्ष तर आहेतच पण लोकप्रिय आहेत.. निवृत्ती ला दहा महिने बाकी आहेत पण तरुणांना लाजवेल इतकं काम ते आजही करतात.. गुन्हे कोणीही दाखल करतील पण पण गैरसमजापोटी खोटे गुन्हे दाखल होऊ नये म्हणून ते खास प्रयत्न करतात. पोलीस दलातील सर्व पोलीस त्यांचा आदर करतात.. खानापूर आटपाडी पलूस कडेगाव तासगाव इतक्या तालुक्याचा प्रभार सांभाळताना सर्व पक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. हळू आवाज मोजकं बोलणं या मुळे त्यांचा सहजासहजी अंदाज येत नसल्याने त्यांचा चांगला वचक पण आहे.. . शक्यतो ते शब्दाने हि कोणाला दुखावत नाहीत.. अशा अधिकाऱ्याने मदत केल्यानं कलाकार आनंदी आहेत. प्रा. दत्ता हेगडे यांनी या छोटयाशा कार्यक्रमाचे नियोजन केले व अंकुश इंगळे साहेबांचे कलाकारांना मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले.. यावेळी सुनील तोरणे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वाभिमानी पोतराज संघटना.., जगन्नाथ जावीर जिल्हाध्यक्ष स्वा. होलार समाज संघटना, हरिभाऊ ऐवळे स्वा. कलाकार संघटना पलूस तालुका अध्यक्ष, युवा नेते योगेश ऐवळे लेंगरे, सुखदेव केंगार देविखिंडी, सोपान जावीर कुर्ली आशुतोष हातेकर युवा तालुका अध्यक्ष, जगन्नाथ ऐवळे अध्यक्ष घाणवड, तसेच अन्य कलाकार जीवनावश्यक वस्तू वाटप प्रसंगी उपस्थित होते.
0 Comments