चित्रनगरी कोल्हापूर येथे सुरू होत असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा व इतर मालिका मध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना व तंत्रज्ञांना काम मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने निवेदन सादर

पुणे / प्रतिनिधी : (सुनिल ज्ञानदेव भोसले)कोल्हापूर येथे सुरू होत असलेल्या मालिका"दख्खनचा राजा जोतिबा"व इतर मालिका मध्ये कोल्हापूर व सांगली जिल्हयातील स्थानिक कलाकार व तंत्रज्ञानां काम मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने कोल्हापूर चित्रनगरीचे उपव्यवस्थापक मा. श्री.भांदिगरे यांना निर्माता श्री.विजयजी शिंदे ( नाना ) ( अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ ) यांच्या हस्ते निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक श्री.ग्यान नरसिंगानी, निर्माता रंगराव कोटकर, आर्ट डायरेक्टर सतीश बिडकर ( संचालक :अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) दिग्दर्शक किशन बोंगाळे ,  अभिनेता महादेव  साळोखे , अशोक सुर्यवंशी, अभिनेत्री कवीता चव्हाण , दिपा पुजारी  अमर कोळी , शिवाजी वायदंडे, सुनिल देसाई , गौतम सावंत आणि प्रदीप जाधव, तसेच इतर सर्व संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.हे निवेदन सादर करण्यासाठी विशेष मार्गदर्शन श्री.बाळासाहेब गोरे यांनी केले.अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने कलाकारांना आणि तंत्रज्ञांना या पुढे देखील सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल अशी माहिती बाळासाहेब गोरे यांनी दिली आहे.