१५ ऑक्टोबर जागतिक शुभ्र छडी सुरक्षा दिनानिमित्त दृष्टीहिनांच्या मदतीसाठी उडान एन्टरटेन्मेंट ग्रुपच्या संगीत मैफलीचे आयोजन

पुणे /  प्रतिनिधी : (सुनिल ज्ञानदेव भोसले) १५ औक्टोबर  "जागतिक शुभ्र छडी सुरक्षा दिना " निमित्त दृष्टीहिनांच्या मदत निधी संकलना साठी दादर कबुतरखाना तर्फे " उडान पॉसिबल " म्हणजेच ( मिशन घे भरारी) ही एक भव्यदिव्य संगीत मैफल सादर करण्यात येणार आहे.तसेच दृष्टिहिनांसाठी मदत संकलन निधी" या पवित्र व उदात्त हेतूने "जागतिक शुभ्र छडी सुरक्षा दिनानिमित्त" १५ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ०८ - ०० वाजता सर्व संगीत प्रेमींच्या सेवेत उडान एन्टरटेन्मेंट ग्रुप  भव्य संगीत मैफल सादर करणार आहेत.विशेषतः उडान एन्टरटेन्मेंट ग्रुपचे दृष्टीहीन व्यावसायिक कलाकार आमच्या अधिकृत यूट्युब चॅनलवर, तसेच udanfoundationngoया फेसबुक पेजवर १५ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ०८ - ०० वाजल्यापासून पुढे live म्युझिकल कन्सर्ट सादर करणार आहेत.या कार्यक्रमाचे प्रायोजक पावर्ड बाय डिस्कव्हर वननेस आहेत , तसेच एफ्एम् रेडिओ पार्टनर - रेडिओ नशा आहे. तर सोशल मिडिया पार्टनर - लॅस डिजिटल मेडिया कंपनी आणि सपोर्टेड बाय इनर व्हील क्लब (डिस्ट्रिक्ट ३१४ झोन २) आहेत. तसेच या संगीत मैफलीची संकल्पना आणि संयोजन उडान फाउंडेशनचे असून सादरीकरण उडान एन्टरटेन्मेंट ग्रुप करणार आहे. विशेषतः अंध दृष्टिहिनांसाठी  मदत निधी संकलित करण्याच्या शुद्ध उद्देशाने सादर करण्यात येत असलेल्या या भव्य संगीत मैफिलीचा मनमुराद रसिकांनी आनंद घ्यावा. विशेषतः उडान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.दीपक बेडसा हे आयोजक दृष्टीहीन आहेत, अंध असूनही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून केवल हरिया यांच्या सहकार्याने अंध कलाकारांना मदत करण्यासाठी त्यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. सर्व संगीत प्रेमी रसिकांना  सुरेल स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलवणारा हा कार्यक्रम निश्चितच मंत्रमुग्ध करेल व रसिकांचाआनंद द्विगुणित होईल यात मुळीच शंका नाही. सर्व रसिकांनी कृपा करून सर्वत्र या संगीत मैफलीची माहिती मित्र मंडळी, कुटुंबियांना जरूर कळवा , कि ज्या योगे दृष्टिहीन संगीतकार, गायक, नर्तक, ॲक्रोबॅट्स इत्यादी आश्चर्यचकित करणाऱ्या आमच्या सर्व अंध कलाकारांच्या कलागुणांचे तुम्ही सर्वजण कौतुक करा, आणि सामाजिक बांधिलकी जपत मदत करण्यासाठी या भव्य कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जरूर प्रचंड प्रतिसाद द्यावा अशी आयोजकांनी विनंती केली आहे. या भव्य संगीत मैफलीची माहिती उडान* *फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त, अध्यक्ष आणि सरचिटणीस दीपक बेडसा आणि यांनी दिली आहे.