प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृक्षा रोपन करून वाढदिस साजरा  

कोरोना योद्याचां सन्मान

देवणी / प्रतिनिथी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने श्रीशांत व सुशांत यांचा वाढदिवस 8 आक्टोंबंर रोजी  वृक्षारोपन करून देवणी खु.येथे साजरा करण्यात आला वृक्ष जनजागृती करणेत येत आली.मानवाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, निसर्गाचे संतुलन राखणे, महापूर यापासून बचाव करणे, थंड सावली देणे, फळे, फुले यांचे सौंदर्य देणे, विविध औषधी वनस्पतीसाठी अशा विविध प्रकारे वृक्षांचे महत्वसांगण्यात आले.  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी ता.अध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी कोरोना योध्दांचे प्रमानपत्र देण्यात आले.या मध्ये हुशेन धोत्रे,पत्रकार अल्लमखाने अंबांदास,गजानन गायकवाड,पंढरी जोळदापके आदीनां देण्यात आले.  वृक्ष वाचवा वृक्ष जगवा ही मोहीम हाती घेतली असून प्रत्येकांनी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे संघाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संपादक प्रा.डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.