आतातरी माझ्या बाबांना पगार द्या -कादंबरी केदार
अनेकजण आली आश्वासन देऊन गेली..
उदगीर / प्रतिनिधी : ओला दुष्काळ आणि कोरोनाची महामारी या संकटाचा आज सामना करत गेल्या पंधरा वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयात बिनपगारी शिकवतात चौदा वर्षाचा हा वनवास संपला असून आतातरी माझ्या बाबांना पगार द्या अशी केविलवाणी आर्त हाक कु. कादंबरी केदार या चिमुकलीने केलेली आहे.
कायम विनाअनुदातीचा कायम हा शब्द काढायला अनेक शिक्षकांनी संघर्ष केला. लाठ्याही खाल्या, शेकडो आंदोलने झाली. १४ वर्षे लागली. मुल्यांकन करुन घ्यायाला ४-५ वर्ष गेली. २०१९ ला अनुदानास पात्र ठरल्या. अनेकजण आली आणि आश्वाने देऊन गेली. सर्वाचे प्रश्न मार्गी लागले पण ज्ञानार्जन करणारा शिक्षक मात्र उपाशी राहिला. शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आता पदापुरतेच राहिले. १००टक्के अनुदान आशा मावळली. पुरवणी मागणीत २०टक्के बजेट मंजूरी दिली असे सांगीतले गेले. थोडे बरे वाटले पण जीआरच काढला नाही .पुन्हा आनंदात इर्जन पडले. विनावेतन काम करणार्या अनेक शिक्षकांना पगार विनाच निवृत होण्याची त्यांच्यावर वेळ आली. अनेकांच्या मुली लग्नाला आल्या तर ज्यांना शिकविले ते विद्यार्थीच पगार उचलू लागले.आता मला माझ्या शाळेत जायला दफ्तर नाही, वही नाही, ना खायाला चाँकलेट नाही. आतातरी माझ्या बाबांना पगार द्यावा अशी कळकळीची मागणी उदगीरहून कांदबरी केदार या चिमुकलीने केली आहे.

0 Comments