शेतकऱ्यांनी हातात रूमने घेतल्याशिवाय भाजपा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार नाही --- गोविंदराव भोपणीकर
देवणी / प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे सरकार हे भांडवलदार यांच्या हिताचे निर्णय घेत आहे सरकार हिताच्या निर्णयाला गोंड्स नाव देऊन शेतकऱ्याची फसवणूक करीत आहे भाजपचे निर्णय हे शेतकरी यांना देशोधडीला लावणारे आहेत शेतकऱ्यांनी भाजपच्या आमिषाला बळी न पडता शेतकऱ्यांनी हातात रमणे घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्ष शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेणार नसल्याचे मत कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते गोविंदराव भोपणीकर यांनी देवणी येथील कांग्रेस पक्षाने आयोजित धरणे आंदोलनात केले
कांग्रेस पक्षाने पारतंत्र्यानंतरअनेक परिश्रमाने उभ्या संस्था कारखाने रेल्वे विमानसेवा विकण्याचा सपाटा भाजपा सरकारने लावला देशात अराजकता माजली आहे भर दिवसा उत्तर प्रदेशात मुलीवर बलात्कार केला जात आहेत त्या बलात्कारित मुलीच्या आईवडिलांचे सांत्वन करण्यासाठी गेले असताना यूपी सरकारने कांग्रेस पक्षाचे नेते मा राहुल गांधी व प्रियंका गांधी वाडेरा यांना रस्त्यात अडवून अपमानास्पद वागणूक दिली या यूपी सरकारचा आम्ही निषेध करतो कांग्रेस पक्ष कधीही खपवून घेतला जाणार नसल्याने या वेळी भोपणीकर यांनी सांगितले
या कार्यक्रमात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील, अभय साळुंके यांनी मार्गदर्शन केले या वेळी कांग्रेस चे युवा नेते विजयकुमार मानकरी , राम भंडारे काशीनाथ मानकरी, धनराज छिद्रे , देविदास पतंगे, रमेश कोतवाल गजानन भोपणीकर अमित मानकरी ,अंकुश बागवाले महादेव मळभागे, भगवान पाटील, भगवान सावंत या कार्यक्रमाचे आयोजन कांग्रेस कमिटीच्या वतीने विजयकुमार मानकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास पतंगे व बालाजी वळसांगवी कर यांनी केले होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रशीद मलेवाले यांनी केले.
0 Comments