वडमुरंबी येथे लसीकरणाला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद

 देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील वडमुरंबी प्राथमिक  आराेग्यवर्धनी उपकेंद्र आराेग्य विभागामार्फत काेराेना संसर्ग महामारी लसीकरणावर मात करण्यासाठी २७ मे,गुरुवार राेजी वडमुरंबी जि.प.प्रा.शाळा येथे लसीकरण माेहिम राबविण्यात आली.
या लसीकरणाला वडमुरंबी नागरिकाने ही माेठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.वडमुरंबी आराेग्यवर्धनी उपकेंद्र ( C.H.O.)समुदाय आराेग्य आधिकारी सरवदे माेना , A.N.M. देवणीकर मॅडम .एस.एन.,MPW.मुंढे एस.बी. आणि स्वंयसेविका काशीबाई पवार . पार्टटाईम  म्हणून इस्मालबी बक्षुसाब मुल्ला.आणि अंगणवाडी कार्यकर्ती शाेभा ताई वेरूळे.माेरे  बकुलाताई .यांची उपस्थिती हाेती.
हि लसीकरण माेहिम वडमुरंबी आराेग्य वर्धनी उपकेंद्राचे (C.H.O.) समुदाय आधिकारी सरवदे माेना यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी आभार मानले.
या लसीकरण मोहिममध्ये पन्नास जणांऩी काेव्हीशिल्ड लसचा लाभ घेतला.या काेविड-१९ लसीकरण स्थानी वडमुरंबी नगरीचे सरपंच ज्ञानाेबा शिंगे .जि.परिषद सदस्य प्रशांत पाटील जवळगेकर ,दवणहिप्परगा प्रशांत पाटील ,जि.प.प्रा.शाळेचे मुख्यध्यापक निलेवाड,शाम शिवराज बिरादर ,शिवलिंगप्पा व्हि. स्वामी ग्रा.पं.सदस्य धनराज एम बिरादर पत्रकार माधवराव  मुर्गे उपस्थित हाेते.ज्या नागरिकाचे वय वर्षे ४५वयाच्या पुढील आहे.अशा नागरिकांना लस सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लस देण्यात आली.हि माेहिम वडमुरंबी येथे राबविण्यासाठी सरपंच ज्ञानाेबा भिंगे  यांनी  आराेग्य विभागाशी संपर्क साधल्यामुळे वडमुरंबी येथे लसीकरण माेहिम राबविण्यात आली..