देवणी येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पहारा 

देवणी / प्रतिनिधी : देवणी शहर व तालुक्यात कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने दररोज कडक पहारा देण्यात येत आहेत .देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड साहेब यांच्या देखरेखेखाली पोलीस कॉन्स्टेबल देविदास किवडे, डी आर नरवटे व बी जी पोले.यांच्या कडक निर्बंधाला पाहून नागरिक अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडत आहेत . अशा या कडक निर्बंधाला पाहून नागरिक घराबाहेर पडत नाहीत अशा या पोलिस प्रशासन व तहसीलदार सुरेश घोळवे साहेब यांच्या कडक निर्बंधांमुळे देवणी तालुक्यात कोरोणाची टक्केवारी कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे .