तहसीलदार सुरेश घोळवे यांचे कार्य कौतुकास्पद --- तहसीलदार डॉ आशिषकुमार बिरादार
देवणी / प्रतिनिधी : देवणीचे तहसीलदार मा सुरेशजी घोळवे सर यांनी तहसील परिसरात शेकडो प्रकारचे झाडे लावून निसर्ग रम्य नंदनवन फुलवले आहे सुरेश घोळवे सर यांनी केलेले कार्य महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा आहे यांचे अनुकरण करून वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवून एक वेगळा आदर्श निर्माण करावा असे मत सोनपेठ चे तहसीलदार डॉ आशिष कुमार बिरादार यांनी व्यक्त केले.
तहसीलदार सुरेश घोळवे व तहसीलदार डॉ आशिषकुमार बिरादार यांनी देवणीतील तहसील तहसील परिसराची पाहणी केली तेव्हा ते बोलत ते पुढे म्हणाले घोळवे साहेब जिथे जातील तिथे शिस्त व हिरवळ हे त्यांच्या कार्याचे फलित आहे असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी मंडळअधिकारी उद्धव जाधव, सुग्रीव बिरादार , मेहत्रे , मोरे उपस्थित होते.
0 Comments