कै.रसिका महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.सचिन चामले यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता
देवणी / प्रतिनिधी : कै.रसिका महाविद्यालय, देवणी येथील शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.सचिन चामले यांची शारीरिक शिक्षण या विषयाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी मान्यता दिली आहे. डॉ. सचिन चामले यांचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पूर्ण झाले असून त्यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयात सेट व नेट (JRF) श्रेणीत व पीएच.डी , एन.आय.एस (ॲथलेटिक्स) शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच यांनी देशविदेशातील चर्चासत्र व कार्यशाळांमधून विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच त्यांना संशोधनाचा 8 वर्षाचा अनुभव आहे. तरूण संशोधक म्हणून त्यांनी नावलौकीक प्राप्त केला आहे. शारीरिक शिक्षण विषयासाठी विद्यापीठाने संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली त्याबद्दल त्यांचे संस्थाअध्यक्ष मा.श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब, संस्थासचिव मा.श्री. गजाननजी भोपणीकर साहेब, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे सर, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments