मुरुड येथील गरजू मजुरांना खासदार सुधाकर शृंगारे यांच्याकडून अन्नधान्याचे किट वाटप
मुरुड / प्रतिनिधी :येथील मोलमजुरी करून जीवन जगणार्या मजुरांना शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे हाताला काही काम नव्हते त्यांचा रोजगार बुडालेला होता व उपजीविका भागवण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित झाला होता व त्याअनुषंगाने जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पुत्राकडून तात्काळ दखल घेऊन मुरुड येथील मजुरांना खासदार सुधाकर शृंगारे यांच्याकडून अन्नधान्याचे किट वाटप
या अन्नधान्य कीट वाटपामध्ये साखर, तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ, तेलाचा, मिठाचा पुडा, अंबारी गरम मसाला, कांदा लसूण मसाला, जिरे, मोहरी, समृध्दी आटा, आदींचा समावेश आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुरांच्या हाताला सध्या काम नाही त्या अनुषंगाने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता, येथील सामाजिक कार्यकर्ते विजय सुरवसे यांनी खासदार पुत्र शंकर शृंगारे यांच्याशी संपर्क करून मदत करण्यासाठी विनंती केली होती त्यांच्या विनंतीला अनुसरून खासदार पुत्राने स्वीय सहाय्यकांना किट वाटपासंदर्भात आदेशित केले त्यांच्या आदेशाला अनुसरून आज मुरुड येथे गरजवंतांना घरपोच अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले आहे.
अन्नधान्याचे किट वाटप केल्याबद्दल शांताबाई इंगळे,
सुषालबाई सरवदे, लिंबराज टिळक, राणी पाचपिंडे, सीता आल्टे, अंजली गाडे, शिल्पा टिळक, महावीर गजेसिंह, शिवराज देशमाने, उषाबाई सुरवसे, हेमा जोगदंड, रूपा जगताप, सुनिता टिळक, अर्चना काळे, संगीता देवकर, मिनाबाई गवळी, वैशाली सोनवणे, राधाबाई टोपे, लक्ष्मीबाई साबळे,मारुती काप्ते, सोपान गायकवाड, धोंडाबाई मस्के, राहुल सुरवसे,भाजपा विद्यार्थी आघाडी प्रमुख विशाल कणसे आदींनी आभार व्यक्त केले आहे.
0 Comments