"शिक्षणातील दहशतवाद "
 विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामधील शैक्षणिक दहशतवाद  , 
 

लेखक -किशन सूर्यवंशी ,लातूर, 9766250921 

1-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी :ए :च्या तृतीय वर्षाला समाजशास्त्राचे एक पुस्तक आहे, त्याचा कोड SOC 222 असून त्या पुस्तकाचे नाव "सामाजिक चळवळी :अस्पृश्यता, निवारण, दलित ,शेतकरी व कामगार " 
 असे नाव आहे, त्यात पान नंबर 48 वर "महात्मा फुले" यांच्या   संदर्भात असा उल्लेख आहे -  
 
हा कसला महात्मा? ही तर फुले नावाची दुर्गंधी !"  

2- त्याच वर्गाला "भारतीय राजकारणाची प्रक्रिया" नावाचे राज्यशास्त्र 224 हे कोड असलेले एक पुस्तक आहे ,त्या पुस्तकात पान नंबर 36 वर "विभूती प्रतिमा" नावाचा घटक आहे ,त्यामध्ये" महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर "यांच्या विषयी बदनामी केलेली आहे, 
 
 महात्मा फुले यांचा उल्लेख "ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हस्तक व ब्रिटिशधार्जिन "असा केलेला आहे, 
 
  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी खालील उतारा आहे , 
 
"सनातनी उच्चवर्णीय हिंदूंनी आंबेडकरांची हिंदू धर्म विरोधक व हिंदू समाज व्यवस्था विरोधक व पर्यायाने धर्मद्रोही व देशद्रोही अशी प्रतिमा चितारण्याचा प्रयत्न केला ,आंबेडकरांची काँग्रेस विरोधी व गांधीविरोधी भूमिका लक्षात घेता त्यांचे राष्ट्रीय चळवळीला विरोध करणारे वा खीळ घालणारे तसेच ब्रिटिश धार्जिन म्हणून एक प्रतिमा काही जणांकडून निर्माण केली गेली , 
 
आंबेडकर हे कडवे साम्यवादी नव्हते म्हणून त्यांना साम्यवाद विरोधी पर्यायाने" उदारमतवादी" "भांडवलशाही लोकशाहीचे "समर्थक म्हणून संबोधले गेले  
 

3- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या "मराठी" या विषयाला "मध्ययुगीन वाडःमय प्रवाह "नावाचे एक पुस्तक आहे , 
 
त्या पुस्तकात पान नंबर 51 वर  घटक 5 आहे ,त्याचे नाव "संत वाडःमय त्याची पूर्वपीठिका" असा आहे , 
त्यामध्ये बहुजन संतांचा खालीलप्रमाणे उल्लेख आहे , 
 
नामदेव -शिंपी,  
चोखा -महार, 
सेना- न्हावी  
सावता-माळी  
विसोबा -खेचर , 
गोरा-कुंभार, 
तुकाराम -कुणबी,  
कबीर -विणकर ,"" 
 
वरील प्रमाणे उल्लेख आहे, 
 
 तसेच त्याच पुस्तकात पान नंबर 61 वर तसेच पान नंबर 68 वर तसेच दुसर्‍या एका पुस्तकात पान नंबर 22 वर असाच उल्लेख आहे,  

याच उताऱ्यामध्ये संत ज्ञानेश्वर यांचा उल्लेख आहे ,पण त्यांचा उल्लेख मात्र" माऊली" असा केलेला आहे , 
 
म्हणजे बहुजन संतांच्या नावापुढे त्यांची जात लावून एक प्रकारे त्यांना जाती मध्येच बंदिस्त केलेले आहे 
 
4 -त्याच पुस्तकात पान नंबर 58 वर असा मजकूर आहे ,"ज्ञानेश्वरांनी एका रेड्याच्या तोंडून वेद वदविले"  

5 -विद्यापीठाला मराठीचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये पान नंबर 74 वर "संत तुकाराम महाराज "यांची माहिती दिलेली आहे, 
 ती अशी ""संत तुकाराम महाराज यांची अभंगगाथा इंद्रायणीत बुडवल्या व त्या पुन्हा पाण्यावर तरंगून जशास तशा वर आल्या"" 
" तुकाराम व शिवरायांची भेट झाली की नाही ते सांगता येत नाही",  

6-इतिहासाचे 280 कोड असलेले एक पुस्तक आहे ,त्यामध्ये पान नंबर 46 वर "वर्णव्यवस्था" या घटकाची माहिती दिलेली आहे  
 
ब्राह्मसय  मुखे मासीज बाह राजन कृत /ऊस तदस्य यद वैश्य पदभयां शूद्र जायत ,   
 

 वरील संस्कृत भाषेतील कडवयाचा अर्थ असा की --- 

ब्राह्मण यांचा जन्म मुखातून झालेला आहे ,क्षत्रियांचा जन्म  मांडीतून व वैशांचा मांडणीतून, शूद्रांचा पायातून झालेला आहे   
 
7-त्याच ईतिहासाच्या पुस्तकात पान नंबर 47 वर" उत्तर वैदिक कालखंड "नावाचा एक घटक आहे, त्यामध्ये असा उल्लेख आहे सामवेद ,यजुर्वेद ,अथर्ववेद ,चार वेद ,ब्राह्मणे ,आरण्यके, उपनिषद या साहित्याची निर्मिती झाली  
 

8- इयत्ता पाचवी या वर्गाला "बालभारती" नावाचे एक मराठीचे पुस्तक आहे, 
 
 त्या पुस्तकात शेवटच्या पानावर अनेक संतांची वचन ,अभंग दिलेली आहेत ,त्यामध्ये संत नामदेवांचा एक अभंग दिलेला आहे, तो असा 
 
"अभ्यासीला वेद झाला ,शास्त्रबोध"" 
 
 म्हणजे संत नामदेव यांनी वेदांचा अभ्यास करूनच त्यांना शास्त्राचा बोध झाला असे या ठिकाणी सांगितले आहे  
 
खरं तर संत नामदेव हे वेद, धर्म पोथीपुराण यांच्या विरोधामध्ये त्यांचे अभंग होते , 
 
ते आपल्या अभंगात एका ठिकाणी असे म्हणतात 
 
 तत्व पुसावया गेलो वेदज्ञसी !!  
तव भरले त्यापाशी विधिनिषेध !!नव्हे ब्रह्मज्ञान शास्त्रबोध !!
 असे अभंगातून सांगणारे संत नामदेव महाराज हे वेदाकडे जातील का ?? 
 
9- इतिहासाचे 280 कोड असलेल्या एक पुस्तक आहे , 
 
त्या पुस्तकात पान नंबर 66 वर "बौद्ध धर्माची वैदिक धर्माशी तुलना ""असा एक घटक आहे , 
 
त्या घटकांमध्ये असे लिहिलेले "आहे "काही विद्वानांच्या मते बौद्ध धर्म व वैदिक धर्म हे वेगळे नाहीत, महात्मा बुद्ध हे मुख्यतः समाजसुधारक होते व दुय्यम रूपात धर्मसंस्थापक होते, बुद्धांनी कोणतेही नवीन धर्माची स्थापना केलेली नव्हती ,त्यांनी प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये चालत असलेल्या रूढी, परंपरा ह्या दूर केल्या ,त्यांच्या विचारावर उपनिषदांचा प्रभाव आहे"", 
 
10- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला "समाजशास्त्राचे कोड 223 "असलेले पुस्तक आहे, त्यामध्ये पान नंबर 68 वर असा मजकूर आहे ,"" 
 
भूतप्रेत हाडळ यांचा निवास वृक्षावर असतो ,काही भूतप्रेत स्मशानात राहतात, भूत-प्रेत बाधा करते, जादू क्रियेत नियम महत्त्वाचे असतात मंत्रोच्चारात अनुक्रम असतो"", 
 
11- बीए तृतीय वर्षाला "सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळी" नावाचा एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा कोड 222 असून त्यामध्ये पान नंबर 13 वर अस्पृश्य  लोकांची कामे दिलेली आहेत, त्यामध्ये त्यांची कामे खालील प्रमाणे दिलेली आहेत , 
""सणांच्या वेळी तर अस्पर्शांनी त्यांच्या घरच्या महिला हिंदू समाजाच्या लोकांच्या करमणुकीसाठी काही दिवस पाठवाव्या , 
अस्पर्श लोकांनी गावापासून दूर अंतरावर राहावे,  
त्यांनी इतरांना शिवू नये, सावलीचा विटाळ होऊ नये , 
अस्पर्शाने स्वच्छ कपडे घालू नये , 
सोन्याचे दागिने घालू नये , 
आपल्या मुलांची नावे निकृष्ट ठेवावी,""