अभ्यासू व सामाजिक बांधिलकी जपणारं नेतृत्व हरवलं                      
देवणी / प्रतिनिधी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा हिंगोली लोकसभेचे माजी खासदार व राज्यसभेचे विद्यमान खासदार श्री माननीय कै. राजीवजी सातव यांच्या निधनाची वार्ता समजल्या बरोबर एक धक्काच बसला. कारण पक्ष कोणता जरी असला तरी राजकारणामध्ये वैचारिक पातळीची चांगली माणसं जिवंत असली तरच, देशाचा राज्याचा व परिणामी स्वतःच्या मतदारसंघाचा भरभरून विकास होतो. श्री मा. कै.राजीवजी सातव हे एकूणच तरुण व वैचारिक पातळीचे नेतृत्व, जे अतिशय कमी वयामध्ये आपल्या लखलखत्या कर्तबगारीचे उजेड पाडणार नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. आपल्या वडिलांच्या अकाली निधनानंतर   राजीव सातव यांनी अतिशय संघर्ष करून आपल्या आईच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाची यशस्वी कमान संभाळली. ते माननीय राहुलजी गांधी यांचे अतिशय जवळचे व विश्वासू मानले जात होते. माझ्या मित्राच्या कामाच्या निमित्ताने हिंगोलीचे लोकसभेचे खासदार असताना सदर मित्रासोबत त्यांना भेटण्याचा योग मला आला.                 
          अभ्यासू,  सुसंस्कृत, मृदू स्वभाव, उमदा व तरुण, सामाजिक व वैचारिक बांधिलकी जपणारं, एक उत्तम चारित्र्यवान योग्य मार्गदर्शन करणारं, एक गोरी गरिबांचां लढवय्या नेता गमावल्याची खंत संपूर्ण मराठवाड्याला नेहमीच लोकांच्या संपर्कात आसणारा एक राजकीय नेता कमवला आहे देवणी तालुक्यातील राजकीय पुठारी , जेष्ट विचावंत , पञकार, वकिल सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने  श्री मा. कै.राजीवजी सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, व हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना देवो ही मनापासून प्रार्थना करतो....