देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकच्या राष्ट्रीय मराठा पार्टीचे प्रभारी म्हणुन श्री. जयदिप (दादा) किशनराव वरखिंडे यांची निवड
देगलूर / प्रतिनिधी : देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक"राष्ट्रीय मराठा पार्टीचे प्रभारी म्हणुन भारतीय मराठा महासंघाचे श्री.जयदिप (दादा) किशनराव वरखिंडे यांची निवड राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी नुकतीच केली आहे.
देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार कै.रावसाहेब अंतापुरकर याचे निधन झाल्या मुळे देगलूर विधानसभा पोट निवडणूक कार्यक्रम लवकर जाहीर होणार असुन " राष्ट्रीय मराठा पार्टी " देगलूर -बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक लढणार आहे.मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद केल्या मुळे मराठा समाजाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी ना शिक्षणात व नौकरीत आरक्षण रद्द झाल्यामुळे तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यात आला आहे. त्यामुळेच उपेक्षित मराठा समाजावर फार मोठा अन्याय झाला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनावर व केंन्द्र शासनावर मराठा समाज नाराज झाला आहे. मराठा समाजाला पर्याय म्हणून महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठविण्यासाठी फार मोठी संधी "राष्ट्रीय मराठा पार्टी" च्या माध्यमातून देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या निमित्ताने माध्यमातून आहे.
" राष्ट्रीय मराठा पार्टी " देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक लढविणार आहे. हि जागा अनुसूचित जाती साठी राखीव आहे. तरीही ईछुक उमेदवारांनी " राष्ट्रीय मराठा पार्टी " देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघाचे पोट निवडणूक प्रभारी श्री. जयदिप (दादा) किशनराव वरखिंडे तळगल्ली देगलूर मो.94038 62995 यांच्याशी संपर्क साधुन उमेदवारी अर्ज करण्याचे आवाहन " राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी केले आहे.
0 Comments