लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने बसवेश्वर महाराज जयंती साजरी
----------------------------------
देवणी / प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या काळात सर्व शासन नियम पाळून लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी ..लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक बांधीलकी आणि महापुरुषाचे आचार विचार ज्वलंत ठेवण्यासाठी  विविध महापुरुषांची जयंती उत्सव साजरी करीत असते त्याचाच एक भाग म्हणून...जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली..                               महात्मा बसवेश्वर महाराजांनी 1200 व्या शतकात सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र करून समाजात सर्व समावेशक अनुभव मंडप स्थापन करून जातीभेद निर्मुलन स्त्रीपुरुष समानता                               ..समाजात घडवून आणली ..कायकवे कैलास हा सिद्धांत मांडला काम हीच पूजा आहे ..आपला सोपवून दिलेला काम आपण प्रामाणिक पने करणे म्हणजेच पूजा साधना होय..खूप मोठी क्रांती त्या वेळी भारतातच नव्हे तर जगात घडवून आणली..अनेक देश विरोधी कायदे मोडीत काढले.समाजाचा कायापालट करायचा असेल तर स्त्रीला समानतेची वागणूक दिली पाहिजे असे बसवेश्वरांनी आपल्या वाचनाद्वारे सांगितले असे या वेळी लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक आद्यक्ष सचिन मंगनाळे यांनी विचार मांडले... या वेळी सचिन मंगनाळे,डॉ.सुरशेट्टे मल्लिकार्जुन (डॉ.सेल राष्ट्रवादी काँग्रेस तालुका आद्यक्ष),पाटील विजयकुमार सर,ज्ञानेश्वर शिंदे, इलाही शेख,मोरे माधव,बबलू शेख,सुमित रोट्टे,शेखर बगदुरे,अनुराग पाटील,विशाल अंबुलगे इत्यादी उपस्थित होते...