कथाकार विलास सिंदगीकर यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड
जळकोट / प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्रातील आघाडीचे कथाकार विलास सिंदगीकर यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याचे महाराष्ट्र शासनाचे सह सचिव मा .श्री. मिलिंद भगवान गवादे यांच्या स्वाक्षरीने एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर करण्यात आले आहे.
नुकतीच महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली केली असून. सदर समिती मध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत,साहित्यिक, लेखक आणि मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणारे साहित्यिक म्हणून कवी विलास सिंदगीकर यांची तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत सदर समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी विलास सिंदगीकर यांना महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,मुंबई मराठी भाषेतील ग्रंथासाठी देण्यात येणारा अतिशय प्रतिष्ठेचा व सन्मानाचा स्व . यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाड़्मय निर्मिती राज्य पुरस्कार मिळाला असून.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचा ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागूल कथा गौरव पुरस्कार ,कोपरगावचा भि.ग.रोहमारे उत्कृष्ट ग्रामीण साहित्य निर्मिती पुरस्कार , तरवडी (जि. नगर) चा सत्यशोधक दिनमित्र मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार , औरंगाबादचा अस्मितादर्श साहित्य पुरस्कार ,अमरावतीचा कै .सूर्यकांताताई पोटे साहित्य पुरस्कार ,मराठी वांड:मय परिषद बडोदे (गुजरात)चा अभिरुची गौरव पुरस्कारासह राज्यस्तरीय अनेक साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.
विलास सिंदगीकर यांचे भूकबळी,गारपीट,उतरंड,रक्त आणि भाकर,बाजार(कथासंग्रह) ढगा ढगा धाव रे,पाऊसगाणी,आनंदगाणी, अमृतधारा(बालकवितासंग्रह) गीत निळ्या आकाशाचे (काव्यसंग्रह)पळसफुलोरा ,(प्रा. काव्य)आदी पंधरा ग्रंथ प्रसिद्ध आहेत.त्यांना अखिल भारतीय साहित्य अकादमी , नवी दिल्ली प्रादेशिक कार्यालय मुंबईची साहित्य प्रवासवृत्ती (फेलोशिप )प्राप्त झाली असून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ "बालभारती" च्या इयत्ता चौथी मराठी पाठ्यपुस्तकात त्यांच्या "आभाळमाया"या कवितेचा समावेश केला असून विद्यापीठीय अभ्यासक्रमातही त्यांच्या कथा-कवितांचा समावेश केला गेला आहे.तसेच मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद केंद्रीय कार्यकारणी स्वीकृत सदस्यपदी त्यांची निवड झाली असून मुखपत्र "प्रतिष्ठान" या नियतकालिकाच्या संपादक मंडळावरही ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
कवी विलास सिंदगीकर यांची साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजयजी बनसोडे, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या सचिव मा श्रीमती .प्राजक्ता लवंगारे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील ,शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे,ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य. रा .रं .बोराडे,आ. बाबासाहेब पाटील ,आ.सतीश चव्हाण,आ. विक्रम काळे,प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ माधव गादेकर,"लसाकम"चे प्रदेशाध्यक्ष प्रा डाॅ संजय गायकवाड,महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य शिवा कांबळे,परभणी आकाशवाणी केंद्र अधिकारी सतीश जोशी, ज्येष्ठ नेते मनमतआप्पा किडे, जळकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मारुती पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनाप्रमुख संगम टाले, आमच्यासह महाराष्ट्रातील साहित्य,सांस्कृतिक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या या निवडीबद्दल स्वागत करून अभिनंदन केले आहे.
0 Comments