लिंगायत महासंघाच्या मुंबई अध्यक्षपदी ॲड.लताताई पटणे यांची निवड जाहीर

मुंबई : लिंगायत महासंघाच्या मुंबई अध्यक्षपदी ॲड. लताताई पटणे यांची निवड आज लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर यांनी जाहीर केली ॲड.लताताई पटणे ह्या गेल्या अनेक वर्षापासून लिंगायत महासंघाच्या विचारधारेशी सहमत असून त्या नेहमीच लिंगायत महासंघाच्या कार्याच्या हितचिंतक राहिल्या  आहेत एक महिला असूनही समाजाशी असलेला संपर्क व सामाजिक विषयाचे ज्ञान आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव हि त्यांना आहे. लिंगायत समाजाबद्दल काही तरी करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये आहे. ते सातत्याने लिंगायत समाजाच्या विकासाबद्दल प्रयत्न करत असतात. अशा ॲड. लताताई पटणे यांची लिंगायत महासंघाच्या मुंबई अध्यक्षपदी निवड लिंगायत महासंघाचे प्रांतअध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार यांनी जाहीर केली असल्याचे लिंगायत महासंघाचे सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील पाटील यांनी सांगितले  लता पाटील यांच्या निवडीबद्दल  लिंगायत महासंघाच्या प्रांतिक कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांनी जिल्हा संघटकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.