मातंग समाजातील महिलांना शिवीगाळ करूण विष्ठा उचलाय लावणा-या पोलिस निरीक्षक केंद्रे वर कारवाई करा.
टेंभुर्णी तील दलित संघटनांची मागणी
टेंभुर्णी / प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी मातंग समाजातील महिलांना आपल्या घरातून बोलवून जबरदस्तीने मानवी विष्ठा व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली व पोलीस स्टेशनचे कंपाऊंड झाडून काढायला लावले तसेच ७५ वर्ष वय कोरोना सारख्या भयंकर आजारातून बरे झालेल्या वृध्द महिलेसही दमबाजी करीत शिवीगाळ केल्याप्रकरणी राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक काशीद, पोलीस कॉ. ठोंबरे, पोलीस कॉ. गुटाळ व इतर पोलीस कर्मचाऱ्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी येथील दलित संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की टेंभुर्णी शहरातील पोलीस ठाणे लगत असलेल्या अण्णाभाऊ साठे नगर येथील मातंग समाजाची रहिवासी वस्ती आहे. त्यामुळे वा-याने कचरा उडून पोलीस ठाणे आवारात जात होता. पोलीस ठाणे आवारात कचरा होत असल्याने पोलीसांनी येथील रहिवाशांना समज देण्याऐवजी शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास वीस ते पंचवीस पोलीस कर्मचाऱ्याच्या सहाय्याने येथील महिलांना व लहान मुलांना राहत्या घरी जाऊन धक्काबुक्की करत अवस्थेत घरातून ओढत बाहेर काढून आणून पोलीस स्टेशन आवारातील घाण तुम्हीच टाकलेली आहे आणि ते तुम्हीच उचला असे म्हणत जवळपास ५० महिला व लहान मुले यांना शिवीगाळ करून त्यांना संपूर्ण कचरा, घाण, गटारी संडास, माणसांची व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली महिलांनी कचरा साफ करण्यास नकार देताच पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काठीने पट्ट्याने मारहाण प्रकरणी करण्यात येईल असा धाक दाखवून त्यांच्याकडून पोलीस स्टेशन परिसरातील संपूर्ण कचरा उचलायला भाग पाडले पोलीसांवर कारवाईचा मागणीचे निवेदन दलित संघटनांनी एकत्रित येऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. मागणीचे निवेदन सोलापूरचे पोलीस अधीक्षक, करमाळा विभागीय अधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी दलित स्वयंसेवक संघाचे अनिल मारुती जगताप, वडार पँथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबा धोत्रे, भीम क्रांती मोर्चा महावीर वजाळे, लहुजी शक्ती सेनेचे अनिल आरडे, मातंग एकता आंदोलनचे रामभाऊ वाघमारे, रिपाइंचे जयवंत पोळ, रिपाइं आठवले गटाचे संघटक परमेश्वर खरात, राहुल कांबळे, अजिंक्य संगीतराव, वंचित बहुजन आघाडीचे विशाल नवगिरे, डी एस एसचे मोहन कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------
पोलीस स्टेशनला मिटींग आहे असे सांगून पोलिसांनी महिलांना घरून नेले शनिवारी दुपारी टेंभुर्णी पोलीसांची गाडी अण्णाभाऊ साठे नगर मधील रस्त्यावर येऊन थांबली तसेच मोटरसायकलीवर २० ते २५ पोलीस येऊन महिलांना चला चला पोलीस स्टेशनला बोलवले. ज्या महिला दार लावून बसले होते. त्यांच्या दारावर काट्या वाजवून महिलांना अगोदर पोलीस स्टेशनला मिटींग आहे असे सांगितले. महिलांना येताच त्यांना दमबाजी करून शिवीगाळ करून पोलिसांनी पोलीस ठाणे आवारात नेले व घाण उचलायला लावली.
पोलिसांकडून कोरोना नियमाचा भंग
महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोणाचे बंधन चालू असताना पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र करण्यात मनाई आहे. परंतु पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी अण्णाभाऊ साठे नगर मधील ५० महिला व लहान मुलांना आहे. या परिस्थितीत विना मास्क व कुठल्याही संरक्षणाशिवाय एकत्रित आणून झाडू मारणे कचरा साफ करणे मानवाची व जनावराची विश्वासात करण्यास भाग पाडले. यातून त्यांनी नियमाच्या जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचा भंग भंग करून तो नियम पायदळी तुडवले आहेत.
0 Comments