प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघामुळे मिळाला न्याय- पत्रकार दादाजी पोटे

यवतमाळ / प्रतिनिधी : मी पत्रकार दादाजी पोटे जिल्हा यवतमाळ, माझ्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांना समजताच तात्काळ सूत्र हालवून मला न्याय मिळवून दिल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे आभार मानतो.
सविस्तर वृत्त असे की, मी पत्रकार दादाजी पोटे कोरोना व लॉकडाऊनमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी मास्क विकण्याचा व्यवसाय करीत आहे. नगरपालिकेच्या तक्रारीवरून पोलीस प्रशासनाने माझा मास्कचा गाडा उचलून ट्रॅक्टरमध्ये भरून नेत असताना मी विनंती केली पण कोणीही ऐकलं नाही. त्यांनंतर  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ राठोड, तालुकाध्यक्ष अनंतराव गोवर्धन यांच्या सहकार्याने संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे यांना घडलेली घटना सांगितली असता डी. टी. आंबेगावे यांनी तात्काळ सूत्र हालवल्यामुळे पत्रकार दादाजी पोटे यांच्या नुकसानीची संपूर्ण भरपाई प्रशासन देणार असून यापुढे पत्रकार दादाजी पोटे यांना प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 
मला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सर व सर्व टीमने न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
पत्रकार दादाजी पोटे
यवतमाळ