वर्षपूर्ती लोकनेत्याची. वर्षपूर्ती संघर्षशील नेत्याची...

लातूर ग्रामीणचे लोकनेते मा.आमदार रमेशआप्पा कराड साहेबांनी आजच्याच दिवशी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. यशस्वी एक वर्ष पूर्ण करताना मा.आमदार साहेबांनी गेली वर्षभरात एक आमदार काय असतो, काय करू शकतो हे लातूर ग्रामीणमधील माझ्यासारख्या असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि जनतेला त्यांच्या कार्यातुन दाखऊन दिलेल आहे. 
           मा.आप्पासाहेब केवळ पदासाठी किंवा पद मिळाल्यावर राजकीय स्वार्थ ठेऊन देखावा करणार नेतृत्व नाहीत हे लातूर ग्रामीणमधील जनतेनी गेली वर्षभरात अनुभवलेल आहे. गेली वर्षभरात त्यांनी कोरोनाच्या काळात असंख्य गोरगरीब नागरिकांना मोफत अन्न वाटप करून त्यांची सेवा करण्याच मोठ काम केल, प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना फोन करून त्या गावातील कोरोनाची स्थिती जाणून घेऊन सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन आजही ते करत आहेत. 
           मा.आमदार साहेबांनी गेली वर्षभरापासून आपल्या आमदार निधीमधून लाखो रुपयाची कामे केली, कोरोना सारख्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक भान ठेऊन लातूर ग्रामीणमधील मुरुड, पोहरेगाव, जवळा(बु.) येथील आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका आणल्या तसेच येणाऱ्या काळात तांदुळजा, बोरी, रेणापूर तालुक्यातील कारेपूर अशा अजून तीन ठिकाणी रुग्णवाहिका आणणार आहेत. त्याचबरोबर कोविड रुग्णालयासाठी आवश्यक साहित्य आणि यंत्रसामुग्रीसाठी 1 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली आहे. फक्त एका वर्षभरात मा.आमदार रमेशआप्पा कराड साहेबांनी पोकळ आश्वासन न देता आपल्या कार्यातुन लातूर ग्रामीणमधील जनतेच्या मनामध्ये मोठ स्थान निर्माण केलेल आहे.
          केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी आणि जनतेच्या अडीअडचणीसाठी धाऊन येणार नेतृत्व आपल्या लातूर ग्रामीणला लाभल हे खुप मोठ भाग्य म्हणाव लागेल. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, 25 वर्ष संघर्ष करून, अनेक अपयशाला सामोर जाऊन, खचून न जाता त्याच जिद्दीने आणि त्याच आत्मविश्वासाने प्रत्येक लढाईला सामोर जाणार हे नेतृत्व आपल्याला लाभल. आप्पा आपली वर्षपूर्ती तर लातूर ग्रामीण मधील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आणि जनतेसाठी अभिमानाची बाब तर आहेच पण येणाऱ्या काळात अशा अनेक वर्षपूर्ती, दशकपूर्ती, आणि शतकपूर्ती आपल्याला साजरी करायची आहे त्यासाठी लातूर ग्रामीणमधील प्रत्येक कार्यकर्ता आपल्याला नक्कीच साथ देत राहील.
           आपल्याकडून येणाऱ्या काळात लातूर ग्रामीणमध्ये आणि जिल्ह्यात असेच विकासात्मक कार्य घडत राहो आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच आई रेणुकादेवीस प्रार्थना.