शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेता राजाराम पाटिल यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात  काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला 

देवणी / प्रतिनिधी : देवणी तालूक्यातील  देवणी खु २६ मे रोजी केंद्रातील  मोदी सरकारची अत्यंत वाईट कारकीर्द सात वर्ष पुर्ण करत असताना व दिल्ली च्या सिमेवर लाखो शेतकरी शेतकरी विरोधी तीन कायदाच्या विरोधात ठाण मांडून बसले  आहेत.अशी परिस्थिती असताना देखील भाजपा मोदी सरकार शेतकरी ,कामगार विरोधी कायदे रद्द न करता देशातील लोकशाही व्यवस्था मोडकळीला  आणून देश अंबाणीच्या दावणीला बांधत आहे. म्हणून मोदी सरकारच्या शेतकरी ,कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात आज ,शेतकरी नेता शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक वेळा आंदोलन मोर्चा मध्ये हिरारीने भाग घेऊन अनेक संघटनेच्या माध्यमातून चळवळ देवणी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या बाजूने खबिर पणे उभे असणारे शेतकरी नेता राजाराम पाटिल च्या वतीने काळ्या फिती हाताला बांधून व काळे झेंडे दाखवून निषेध दिन करण्यात आले या कोरोनाच्या माहामारीत आशा संकटात शेतकरी बाधव दिल्लीच्या सिमेवर तीन कायद्याच्या विरोधात  ठाम माडुन  बसले आहेत आतापर्यंत न्याय मिळाला नसल्यामुळे  शेतकरी नेता राजाराम पाटिल यांनी देवणी खु येथे  कोरोनाच्या परिस्थिती सामाजिक अंतर पाळत शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणजे  काळ्या फिती हाताला बांधून व काळे झेंडे दाखवून निषेध दिन करण्यात आले या वेळी  शेतकरी बांधव उपस्थित होते.