राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब पिक विमा न मिळाले बाबत निवेदन देण्यात आले
देवणी / प्रतिनिधी : लातूर जिल्हा्सह देवनी शहर व तालुक्यातील सोयाबीन पिकाला पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नसल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित भैया देशमुख साहेब कृषिमंत्री दादासाहेब भिसे लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले लातूर जिल्हा व देवणी शहर व तालुका येथील शेतकऱ्यांनी सन २०२० मध्ये सोयाबीन पिकाचा विमा भरला होता लातूर जिल्हा सह देवनी शहर व तालुक्यातील अतिवृष्टीने सोयाबीन पीक हे वाहून गेले असताना देखील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे अपेक्षित होते मात्र सोयाबीन पिकाला पीक विमा कडून कात्री लावण्यात आले याचा अर्थ सोयाबीन पिकाला पीक विमा दिला गेला नाही सदर सोयाबीन पिकाची आणेवारी कमी असताना देखील सदर तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी सोयाबीन पिक विमा बाबत चुकीची माहिती पाठवल्यामुळे लातूर जिल्हा सह देवणी तालुका शहर शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे सदर पिक विमा ४० टक्के लोकांना पडलेला आहे तर बाकीच्या ६० टक्के लोकांना पिक विमा पडलेला नाही कारण सदर लातूर जिल्हा व देवनी शहर व तालुक्यातील प्रमुख पीक हे सोयाबीन असतानादेखील पिक विमा कंपनीने ज्वारी व तुरी साठी पिक विमा मंजूर केलेला आहे पिक विमा कंपनीच्या अधिकार्यांशी याबाबत विचारणा केली असता सदर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत सदी माननीय मुख्यमंत्री साहेब व कृषिमंत्री साहेब लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी याची तात्काळ दखल घेऊन पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची संवाद साधून लातूर जिल्हा सह देवनी शहर तालुक्यातील सोयाबीन पिकाला पीक विमा मिळून देण्यात यावे असे पत्र राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख व बसवा टीव्ही मराठी चॅनल चे महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांनी निवेदनाद्वारे देण्यात आले
0 Comments