कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळेल पेन्शन
मुंबई : केंद्र सरकारने अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे ज्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मदतीअंतर्गत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाला पेन्शन देण्यात येणार आहे आणि यासोबतच वाढीव विम्याची रक्कमदेखील दिली जाणार आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजे ईएसआयसीच्या योजनेचा लाभ त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांचे मासिक उत्पन्न २१,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. दिव्यांगांच्या बाबतीत ही मर्यादा २५,००० रुपये इतकी करण्यात आली आहे. कोरोनामुळे कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाला सन्मानपूर्वक आपले आयुष्य घालवता यावे आणि राहणीमानाचा स्तर चांगला ठेवता यावा यासाठी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबापर्यत कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजे ईएसआयसीच्या पेन्शन योजनेचा लाभ पोचवला जाणार आहे.
मृत्यूच्या निकषात ईएसआयसीने केला बदल
कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजे ईएसआयसीने विमाधारकाच्या सामाजिक सुरक्षेची मर्यादा वाञवत एक नवीन विशेष लाभ योजनेचे तरतूद केली आहे. ईएसआयसीने IP’sसाठीच्या मृत्यूच्या व्याख्येत बदल करत या संदर्भात कोविड-१९ मुळे झालेल्या मृत्यूचाही समावेश केला आहे. कोविड-१९मुळे घरी झालेल्या मृत्यूचादेखील यात समावेश असेल.
ईएसआयसी अंतर्गत कौटुंबिक पेन्शन
या कुटुंबांना सन्मानाने आयुष्य जगता यावे आणि चांगले राहणीमान राखता यावे यासाठी मदत करण्याच्या हेतूने रोजगाराशी संबंधित मृत्यूच्या प्रकरणात ईएसआयसीने पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू होईल त्याच्या कुटुंबाला पेन्शन दिले जाणार आहे.
0 Comments