बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची वैद्यकीय सेवा बजावणारे  :  डॉ सोमवंशी कुटुंब
---------------------------------
उदगीर / प्रतिनिधी : फुले,शाहू आंबेडकर बसवेश्वर या महापुरुषाला आपले आदर्श मानून या महापुरुषांच्या कार्याचा आदर्श वारसा अनु रेणू बनून का होईना सर्वसामान्य लोकांची वैद्यकीयसेवा करावी हा उद्देश  ठेवून समतेचे पुरस्कर्ते बहुजन उद्धारक महात्मा बसवेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून एक मोठं हॉस्पिटल स्थापन करून रोग्याची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून डॉ दीपक सोमवंशी व डॉ ज्योती ताई सोमवंशी यांनी अविरत सेवा चालविली आहे.
         डॉ दीपक सोमवंशी हे महिला रोग विशेषतज्ञ आहेत तर डॉ ज्योती ताई ह्या नेत्र रोग तज्ञ आहेत महिलांच्या विविध रोगांवर अभ्यास पूर्ण उपचार करून अनेक महिलांना रोगमुक्त करून  अनेक महिलांच्या जीवनात " दीप ज्योत"  प्रज्वलित करण्याचे काम या सोमवंशी दाम्पत्याने केले आहे  डॉ ज्योती ताई यांचे काम  तर  नेत्रदीपक आहे   ज्योती ताई यांनी अनेक  लोकांच्या नेत्रात नेतृदोष असणाऱ्या हजारो लोकांचे ऑपरेशन करून अनेक दृष्टी हीन लोकांना दृष्टी देण्याचे काम ज्योती ताई यांनी केले आहे  म्हणून ताईचे काम नेत्रदीपक आहेत  दीप आणि ज्योती    सतत स्वतः तेवत राहून दुसऱ्यांना प्रकाश देण्याचे काम हे करीत आहेत  यांचे कार्य वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात मोठे योगदान असणाऱ्या डॉ  दीपक सोमवंशी व डॉ सौ  ज्योतीताई  सोमवंशी यांचा लग्न वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसा निमित्त Btv News Maharashtra न्यूज चैनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा...