विश्वशांतीचे ऊद्गगाते तथागत,भगवान गौतम बुध्द....
प्रा.एम.एम.सुरनर
परभणी / प्रतिनिधी : वैशाखी पोर्णिमा जगात क्रांतीला जन्माला घालुन गेली गौतम बुध्द्…भारतीय इतिहासातील एक अजरामर आणि अभिमानाने जगाला सांगावा असा महामानव. या महामानवाची जयंती मौजे चाटोरी येथे साजरी करत असताना प्रमुख वक्ते म्हणुन महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ प्रा एम.एम. सुरनर सरांनी संबोधित करताना तथागताचा धम्म व त्यांच्या धम्माचे ज्या भारतीय मनुष्यत्वाला सर्वात जास्त भारता बरोबरच जगाने देखील अत्यंत विश्वासाने ‘ आपला मार्गदर्शक ‘ मानला असा गौतम बुध्द् होय.मानवी प्रज्ञेची एक मोठी उंची बुध्दरुपाने जगाने पाहिली.बुध्दाचे थारेपण असे की,या मनुष्याने पहिल्यादा जगाच्या सीमा ‘ बुध्द् आमचा सांगाती ‘ या घोषणेने जवळ आणल्या.बुध्द भले जन्माला भारतात आले असतील,भले त्यांचे जीवनकार्य भारताच्या सीमांमध्येच त्यांच्या हयातीत घडून आलेले असेल परंतु बुध्दाने केवळ भारताच्या सीमाच ओलांडून दाखवल्या नाहीत तर ‘ विश्वनागरीकत्वाचे अमुल्य बीज ‘ बुध्दानेच जगात पहिल्यांदा रोवले.महाराष्ट्रातील थोर विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांनी गौतम बुध्दाला ‘ सर्वोत्तम भूमीपुत्र ‘ असे जे संबोधले आहे ते अत्यंत यथार्थ आहे.गोतम बुध्दाचा वारसा आपण आजदेखील ‘ आमचा वारसा ‘ म्हणून जगभर मिरवतो.भारताचा जगभरचा जो चेहरा आहे तो चेहरा" गोतम बुध्दाचा भारत "या नावानेच प्रसिध्द् आहे.एका अवाढव्य् देशाचे प्रतिक म्हणून एखाद्या व्यक्तीचा नामनिर्देश व्हावा यातच त्य व्यक्तीचे अखंड मोठेपण सामावलेले आहे हे निश्चितच.
गोतम बुध्द्…हा शब्द् कानावर पडला की समोर आणखी दोन मुल्ये जागी होतात.सत्य आणि अहिंसा.साऱ्या जगाला सदोदीत मार्गक्रमण करावयाची जी दोन प्रमुख मुल्ये आहेत ती दोन्ही मुल्ये बुध्दात प्रखरपणे आढळतात. आढळतातच असे नव्हे तर , या दोन मुल्यांचा ‘ जागतिक चेहरा ‘ अशीच बुध्दांची ओळख आहे.बुध्दाचा कालखंड हा साधारणपणे अडीच हजार वर्षे अगोदरचा आहे. तब्ब्ल अडीच हजार वर्ष हा मनुष्य संपूर्ण मानवजातीला ललामभूत वाटावी इतकी थोरवी बुध्दांनी कमावलीय.इथे एक गोष्ट् विसरता कामा नये की,महाभारत युध्दाच्या नंतरच गोतम बुध्दृ निर्माण होतो याला काही या महाभारतीय युध्दाची पार्श्वभुमी अजिबातच नाही असे म्हणणे योग्य ठरेल का याचा विचार अभ्यासकांनी करायला हवा. महाभारताचे प्रचंड युध्द् आणि या महायुध्दात झालेली विध्वंसक अशी मनुष्यहानी …या पार्श्वभूमीवर युध्द् नको ,बुध्द् हवा ‘ ही घोषणा पहायला हवी.बुध्दपूर्व काळात लिहिलेल्या जातक कथा मधून महाभारत काळातील चोल,अंग अशी गणराज्यांची नावे डोकावतात ती काही उगीच नसावी.त्या काळात शब्दबध्द् करून ठेवावी अशी ऐतिहासीक परिस्थिती असल्याने या घटना तत्कालीन समाजघटकांनी आपापल्या भाषेत व बोलीभाषेत देखील जपून ठेवल्या.साहजीकच त्या जरी जपल्या गेल्या तरीही त्याच्यावर अनेक पुटे चढली.मुळ कहाणीत अजून काही कहाण्या घुसडण्यात आल्या. बुध्दाच्यावेळी परिस्थिती थोडी सावरली होती.बुध्दाचा उपदेश त्याच्या अनूयायांनी जपून ठेवला आणि प्रचारात देखील आणला .याच कारणाने बुध्दाचा थोडा का असेना पण ऐतिहासीक वारसा जगासमोर आला.अन्यथा राम व कृष्णाच्या वाटयाला जे काही आले जे बुध्दाच्या वाटयाला देखील आले असते असे म्हणण्याला काही आधार नक्कीच आहे.बुध्दाच्या थोर कामगिरीवर प्रश्न् चिन्ह लागले नाही हे अखिल जगताच्या दृष्टीने मोलाची बाब ठरली.याचा अर्थ असा नव्हे की,बुध्दाचा संदेश कोणत्याही मिलावटीविना जनमाणसांत प्रसूत झाला. बुध्दाच्या संदेशात देखील हितसंबंधी मंडळीनी विच्छेद केलाच. परंतु त्यामधूनही जेवढा काही बुध्द् आपल्यापर्यंत पोचला तो बुध्द् देखील जगाला वंदनीय व अनुकरणात्मक वाटला यामध्ये बुध्दाचे महानपण स्पष्टपणे दिसते.
बुध्दाच्या काळातही राज्यव्यवस्था अमानुष होतीच.गुलामांची खरेदी विक्री चालूच होती.सामान्य लोकांना राज्यव्यवस्थेचा जाच हा होताच.तरीही अशा प्रतिकुल अवस्थेत बुध्द् अखिल जगतासाठी शांतीचा संदेश घेऊन उभा राहिला.अध्यात्मवादी परंपरेला नवे विधायक वळण देण्यासाठी काही नवीन मुल्ये घेऊन उभा राहिला.आपल्या संदेशाच्या प्रचारार्थ काही सच्चे अनुयायी मिळवण्यात बुध्द् यशस्वी ठरला.राज्यव्यवस्थेला जोडून घेण्यात त्याला यश आले.सामान्य लोकांच्यासाठी तो काही कृतीशील आचरणाचे नवीन दाखले देऊ शकला .आपल्या अनुयायांच्या मार्फत आपल्या उपदेशाला शब्दांकीत करू शकला. बुध्दाने तत्कालीन समाजाला काही नवीन वळणावर येण्याचे आवाहन केले आणि त्याचा बराच प्रभाव झाला.त्याच्या अनुयायांनी त्याचा संदेश त्याच्या हयातीनंतर जगाच्या वेगवेगळया कोपऱ्यात नेला. यामध्ये नागार्जुन व अश्वघोष यासारखे काही बुध्दाचे तत्वज्ञानी अनुयायी होते तसेच सर्माट अशोक यासारखा राज्यकर्ता देखील पुढील काळात मिळाला आणि बुध्द् विचार जगभर पोचला. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की,बुध्दाने मानवी समाजाला दिलेली बहुमुल्य भेट कोणती आणि आजच्या काळात त्या भेटीचे मानवी जीवनातील नेमके प्रयोजन काय ?
बुध्दाने मानवी जीवनाला एक वेगळया प्रकारचे वळण देण्याचा प्रयत्न केला.सत्य व अहिंसा या मुल्यांचा जयघोष मोठा करुन या दोन मुल्यांचे मानवी समाजाला असण्णारे आकलन बुध्दाने खूपच अधिक उंचीवर नेले.बुध्दाने आणखी एक महत्वाची गोष्ट् केली ती म्हणजे त्याचे मानवी प्रज्ञेची ताकद त्याला समजावून दिली. अत्त दिप भवं अर्थात ‘ स्वयंप्रकाशित व्हा ‘ हा बुध्दाचा संदेश हा मानवी समाजाला बुध्दाने दिलेली अमुल्य अशी भेट आहे. बुध्दापूर्वीच्या इतर दार्शनिकांनी आणि खरेतर नंतरच्याही बरेच दार्शनिकांनीही जगाला प्रकाश दाखवताना स्व्त:च्या प्रज्ञेला शरण येण्याचे आवाहन केले.बुध्द् मात्र जगाला प्रकाश दाखवताना ‘ स्वयंप्रकाशित व्हा ‘ असा संदेश देतो. यामधून तो आपल्या अनुयायांना तो आपल्याला शरण येण्यासाठी सांगत नाहीच. परंतु मो समस्त जगातील मानवांना ‘ स्वृत: मधील बुध्दत्व " शोधण्याचे आवाहन करतो आणि इथेच बुध्द् इतर सर्व दार्शनिकांपासुन वेगळा होतो आणि ‘ जगाचा खरा मार्गदर्शक ‘ बनतो. तो आपल्या विचारांना अंतिम मत मानत नाही तर प्रत्येकाला तो आपापल्या बुध्दी चालवण्यासाठी आवाहन करतो. बुध्द् हाच खरा मोक्षदाता असून त्याला शरण या असे भाकड कथानक बुध्द् ऐकवत नाही. मानवी प्रज्ञेला खचितच इतक्या खोलवर कुणी जाणले असेल आणि आवाहन केले असेल.बुध्दाने मानवी जगताला स्व्त:च्या प्रज्ञेवर विश्वास ठेवण्याची जी जाणीव करुन दिली ती बुध्दाची सर्वोत्त्म देणगी आहे.
मानवी जगतात अनेक थोर पुरुष जन्माला आले खरे.परंतु बुध्दाप्रमाणे अखिल जगतावर इतकी खोलवरचा ठसा कुणीही उमटवू शकले नाही.आज बुध्दाकडून आपल्याला जे शिकायचय ते एवढेच की,स्व्त:ला जाणा,स्व्त:मधील प्रज्ञा अधिक उन्न्त करा.तुमची प्रज्ञाच तुमची खरा मार्गदर्शक आहे.स्व्त:ला प्राप्त झालेले ज्ञान हे जगातील इतर कुणालाही उपलब्ध होऊ शकते याची पहिली जाणीव मानवी जीवनाला बुध्दाने करुन दिली.तुम्हीही तुमच्या प्रज्ञेवर विश्वास ठेवलात तर ….बुध्द् बनू शकता हाच बुध्दाचा संदेश आहे.
बाबासाहेब की धम्म क्रांतीसे नाचने लगा मनमोर, सारे जगमें गुॅंज ऊठी है, ईसी बातपर शोर की भाई चलो बुध्द की ओर,
कल चॉंद भी लेगा दिक्षा
सुरज भी लेगा दिक्षा
धरती भी कहने लगी यही है, मेरी सुरक्षा
चॉंदनी भी देने लगी है, ईसी बातपर जोर की भाई, चलो बुध्द की ओर, की भाई चलो बुध्द की ओर
असा विज्ञानवादी धम्म जगाने स्वीकारला तर जग सुखी होईल असा संदेश देत प्रा.सुरनर सरांनी अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन लुंबिनी विहार चाटोरी येथे करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.विठ्ठल मस्के सर तर आभार शाहीर सचिन मस्के यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौतम मस्के, एकनाथ दिवसे,गंगाधर मस्के,संघरत्न मस्के, प्रेमानंद मस्के,विठ्ठल मस्के तथा सर्व अनुयायानीं परिश्रम घेतले...
🎙️🇪🇺🎙️🇪🇺🎙️🇪🇺🎙️🇪🇺🎙️🇪🇺🎙️🇪🇺
0 Comments