नायगाव मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
नायगाव बाजार / प्रतिनिधी : समतानायक,लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्ताने लिंगायत समाज नायगाव तालुक्याच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर चौकात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वाढत्या उन्हाच्या पाऱ्यात व कोव्हिडच्या संकटात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवाच्या जयतीं निमित्ताने लिंगायत समाजाने एक आदर्श घालून दिला आहे.
महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शकतात जो आदर्श घालून दिला आहे.त्याच आदर्शाचे दर्शन त्याचे अनुयायी करत असल्याचे सदरील रक्तदान शिबीरातून दिसून येते.
यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या तैलचित्राचे पूजन व शिबिराला भेट देण्यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलिकर,माजी आमदार वसंतराव पा. चव्हाण,सभापती संजयआप्पा बेळगे, जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे,युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण,माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर,बालाजी बच्चेवार,भास्कर पाटील भिलवंडे,श्रावण पाटील भिलवंडे माजी नगराध्यक्ष शरद भालेराव,माजी उपनगराध्यक्ष विजय पा. चव्हाण,श्रीनिवास पाटील चव्हाण,देविदास पाटील बोमनाळे, भगवान पाटील लंगडापुरे आदींनी उपस्थिती होती.
यावेळी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीच्या वतीने प्रत्येक गावात जाऊन कॉर्नर बैठका व परिश्रम घेण्याचे अद्वितीय कार्य राजूआप्पा बेळगे,विठ्ठल बेळगे, अविनाश अनेराये,केशव पांडागळे, राहुल अनेराये,विश्वनाथ बोंमनाळे, बालाजी धोते,विजय अनेराये,मनोज बेळगे यांच्या समवेत संयोजनासह सूत्रसंचालन निळकंठ ताकबीडकर ह्यांनी केले.
0 Comments