नविन ग्रामीण रुग्णालयांच्या ईमारतीत ५० बेडचे आँक्सिजन उपयुक्त काेविड- केअर सेंटरची उभारणी
निलंगा / प्रतिनिधी : औराद (शहाजनी) ता. निलंगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, नविन ग्रामीण रुग्णालयांच्या ईमारतीत ५० बेड, आँक्सिजन उपयुक्त काेविड- केअर सेंटर, आज भाजपा युवा नेते श्री. अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत "अक्षय तृतीयेच्या" मुहुर्तावर शुभारंभ करण्यात आला.
औराद (शहाजनी) परीसरातील गावातील नागरिकांसाठी एक चांगलीच उपलब्धताही सुरू झाली आहे. काेविड- सेंटर सुरू करण्यासाठी भाजपा युवा नेते श्री. अरविंद भैय्या पाटील निलंगेकर साहेबांनी रात्रंदिवस, सरकारकडे पाठपुरावा सतत केला. या पाठबळाला चांगली हाक मिळाली आहे. जेणे करून गरजूं रुग्णांना मोफत उपचार घेणे सोपे होईल...
यावेळी, निलंगा तहसीलदार श्री. गणेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्री. श्रीनिवास पाटील, वैद्यकीय अधिकारी श्री. ज्ञानेश्वर कदम, डाॅं वैभव कांबळे, व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments