राष्ट्रीय मराठा पार्टीचे उपोषण मागे

देवणी / प्रतिनिधी : मौजे होनाळी ता.देवणी जि.लातूर येथील गावात र्थी फेज डी.पी.साठी लागणारे उपकरणे किटकँट, फयुज, केबल,सिंगलफेस डी.पी.बदलणे 63 केव्हीची डी.पी.बदलून 100 केव्ही करून देण्यात येईल. व डी.पी. दुरूस्त करून बसविण्यात आला आहे.त्याठिकाणची लाईट व्यवस्थीतपणे चालु करण्यात आली आहे. तरी सध्याच्या या कोरोणा-19 च्या वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेवुन आपण उपोषण मागे घ्यावे असे लेखी पत्र कार्यकारी अभियंता, महावितरण, कार्यालय उदगीर यांनी दिले आहे.म्हणुनच आज रोजीचे उपोषण मागे घेत आहेत.