काँग्रेसचे जेष्ठ नेते कै.दत्ता भाऊ मस्के यांच्या परिवाराचे लातूर मनपाचे महापौर यांच्याकडून सांत्वन
लातुर / प्रतिनिधी : गेल्या दोन दशकापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांनी नि:स्वार्थपणे काम करून माजी मुख्यमंत्री स्वः विलासरावजी देशमुख साहेब माजी मंत्री मा.दिलीपरावजी देशमुख साहेब व लातूरचे पालकमंत्री मा.ना.अमीत ( भैय्या ) देशमुख साहेब यांचा विश्वास संपादन करून एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आपली सर्वदूर ओळख निर्माण करणारे, तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती कमीटीचे माजी अध्यक्ष, आणि ग्राम परिसर विकास शिक्षण संस्थेचे संचालक मिस्टर नगरसेवक कै.दत्ता व भाऊ मस्के , यांचे अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. ही बाब अत्यंत वेदनादायी आहे या दु:खातून सावरण्यासाठी मस्के परिवाराचे आज लातूर महानगर पालीकेचे धडाडीचे महापौर मा.श्री.विक्रांतजी गोजमगुंडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले यावेळी काँग्रेस पक्षाचे राजाभाऊ माने,रघुनाथ मदने राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस दयानंद कांबळे सह मस्के परीवारातील सदस्य तथा ग्रामपरिसर विकास शिक्षण संस्थेचे सचिव श्री.संभाजीराव मस्के,नगरसेविका श्रीमती वर्षाताई दत्ता मस्के,श्री.लक्ष्मण मस्के,श्री.विनोद मस्के,सौ.ज्योतीताई मस्के,दक्ष दत्ता मस्के,शर्वरी दत्ता मस्के आदी उपस्थित होते.
0 Comments