जी पतना पासून वाचवते ती पत्नी - प्रोफे. डॉ रामकृष्ण बदने
आपल्या भारतीय संस्कृतीत हिंदू धर्माने मानवी जीवन चार आश्रमात विभक्त केले आहे. त्यातील दुसऱ्या आश्रमापासून म्हणजेच गृहस्थ आश्रमापासून आपल्या जीवनात पत्नीचे पदार्पण होते. पत्नी ही क्षणाची पत्नी असून ती अनंत काळासाठी माताच आहे. तिला पत्नी म्हणून पतीकडे येत असताना अनेक पातळीवर त्याग करावा लागतो. स्वतःचे नाव, आडनाव, गाव,आई-वडील या सगळ्यांचा त्याग करावा लागतो. एवढेच नाही तर अनेक वेळा तिने पाहिलेली अनेक स्वप्ने ही त्यागावी लागतात. पतीच्या घरी आल्यावर अनेक गोष्टीत तडजोड करावी लागते. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊनच आपल्या शास्त्रांनी पत्नीला पती पेक्षा अधिकचे महत्त्व दिलेले आहे.हिंदू धर्मात हनुमंत सोडले तर सगळे देव आपल्या पत्नी सोबत दिसतात. आपल्याकडे ईश्वराच्या स्तवनातही अगोदर पत्नीचा उल्लेख आढळतो. जसे गिरीजार्देहम,पार्वतीपते,सिताराम, लक्ष्मीपती,लक्ष्मीकांत, रखुमाईचा पती, रुक्मिणीप्राण संजीवन, रखुमाई वल्लभा,राहीचे वल्लभा,या व यासारखे अनेक दाखले आपल्याला देता येतात. आपल्याकडे अनेक आदर्श पत्नी होऊन गेल्या. रामायणात,सीता मंदोदरी, महाभारतात गांधारी व द्रोपदी, नंतरच्या काळात विठ्ठलपंत व रूक्मीणी, गोस्वामी तुलसीदास व त्यांची पत्नी, रामकृष्ण परमहंस व शारदामणी, महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.पत्नीचे शास्त्रात सात प्रकार सांगितले आहेत.ज्यात व्याभिचारीपत्नी,कर्कशापत्नी, कामपत्नी,अर्थपत्नी,धर्मपत्नी,
मोक्षपत्नी, व सेवापत्नी येतात.यातील मोक्षपत्नी व सेवापत्नीचे महत्व शास्त्राने आदर्श पत्नी म्हणुन केले आहे. पत्नीला अनेक नावाने ओळखले जाते. बायको, कांता, अर्धांगिनी, भार्या, कामिनी व अन्य अनेक नावे आहेत. पण पत्नी या शब्दाचा जर आपण बारकाईने अर्थ लक्षात घेतला तर जी पतीला पतना पासून वाचवते मग ते शारीरिक असेल अथवा मानसिक असेल ती पत्नी होय. ती संस्कारी नसेल तर ती पतीला पतनाकडे ही घेऊन जाऊ शकते. पण शास्त्रांनी मात्र पतनापासून वाचवते तिलाच पत्नी म्हटले आहे असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा प्रसिद्ध वक्ते प्रोफेसर. डॉ रामकृष्ण बदने यांनी 'व्यक्तिमत्त्व विकास 'या फेसबुक पेजवर 'आदर्श पत्नी' या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यान प्रसंगी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथील प्राचार्य डॉ. के.के. पाटील हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक ,उत्कृष्ट वक्ते तथा व्यक्तिमत्त विकास पेजचे संपादक प्रा. डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की ,'प्रत्येकाला घडविण्यात स्त्रीचा महत्त्वाचा वाटा आहे.मग ती आई म्हणून असेल पत्नी म्हणून असेल अथवा बहीण व अन्य नातेसंबंधाने असेल
. प्रोफे. डॉ.बदने सरांनी आजपर्यंत महाराष्ट्राला आईचे महत्व आपल्या लेखनीतून व वाणीतून करुन दिले आहे.आता ते पत्नीसंबंधाने लिहीत आहेत तेव्हा त्यांना या विषयावर बोलण्यासाठी आम्ही पाचारण केले, असे डॉ हनुमंत भोपाळे यांनी सांगितले.
हे ऑनलाईन व्याख्यान श्रवणासाठी उस्मानाबाद येथून ह.भ.प.भारत महाराज कोकाटे,आळंदीहून ह.भ.प.मनोहर महाराज आळंदीकर, पुणे येथून डॉ.शिवानंद स्वामी,शंकर मुगावे,मानवत येथून प्रा.सौ. डॉ.अर्चना बदने, जळकोट येथून प्रा. डॉ. रामचंद्र पस्तापुरे,मोहन अंदुरे,अंकुश सिंदगीकर, प्रा. डॉ. सखाराम गोरे, गोविंद मिरकुटे,सोमेश्वर केंद्रे, जिंतूर येथून प्रा.बाबासाहेब फड,पालम येथून प्रा.डॉ. घनश्याम पांचाळ,अंजली जंगम, दत्तात्रय बाबुराव जाधव, प्रकाश पवार,प्रा. डॉ. साईनाथ शेटोड,प्रा. डॉ. नागोराव आवडे, विद्या गाडेकर,उद्धव मुरकुटे,श्रीधर जाधव,.पंडित पवळे आदी मान्यवर आणि श्रोते उपस्थित होते तद्नंतर पेजला भेट देऊन असंख्य श्रोते फेसबुकवरील व्याख्यान श्रवणाचा लाभ घेत आहेत.
0 Comments