कोविड-19 काळात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेची महत्वपूर्ण कामगिरी
*या रुग्णालयामध्ये माहे मार्च 2020 पासुन ते आजपर्यंत 51 हजार पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी; तर 10 हजार रूग्णांवर उपचार*
*म्युकर मायकॉसिस या आजारावरील उपचारासाठी संस्थेमध्ये स्वतंत्र 30 खाटांचा रुग्णकक्ष कार्यान्वित*
*कोविड-19 च्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने बालरोग विभागासाठी स्वतंत्र दोन रुग्णकक्ष तयार करणार*
*संस्थेच्या विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेमध्ये आजपर्यंत एकुण 2 लाख 2 हजार 636 व्यक्तींची RT-PCR चाचणी*
लातूर, दि.24(जिमाका):- संपूर्ण जगात covid-19 या आजाराने थैमान घातलेले असताना लातूर जिल्ह्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेनेही या साथरोगाशी लढण्यासाठी आपली पूर्वतयारी करून ठेवलेली होती. या रुग्णालयांमध्ये covid-19 चा पहिला लाटे पासून ते सध्याची दुसरी लाट व पुढे येऊ घातलेली तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जवळपास सर्व आरोग्य साहित्य उपलब्ध असून येथील तज्ञ डॉक्टर मंडळीने जवळपास दहा हजार पेक्षा अधिक पॉझिटिव रुग्णावर उपचार केलेले आहेत. या साथीच्या आजारांमध्ये हजारो रुग्णांवर उपचार करून रुग्णांना ठणठणीत बरे करण्यात महत्त्वाची भूमिका या संस्थेने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे, अशी माहिती संस्थेचे अधिष्ठता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी दिली आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये माहे मार्च 2020 पासुन आजतागायत एकुण 51 हजार 489 रुग्णांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी 10024 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. कोविड-19 च्या दुस-या लाटेच्या अनुषंगाने या रुग्णालयाकडुन आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली होती. कोविड-19 च्या रुग्णांकरिता क्षमतेपेक्षा अधिक रुग्णखाटा ऑक्सीजनयुक्त व अतिदक्षता विभागाच्या अशा जवळपास 500-550 कार्यान्वित करुन् रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. तसेच एकुण 22 कोविड-19 रुग्णांचे डायलेसिस करण्यात आल्याची माहिती डॉक्टर देशमुख यांनी दिली.
तसेच नव्याने केंद्रशासना मार्फत 25 व्हेंटीलेटर दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी प्राप्त झाले व सी. एस. आर. निधीमधुन 15 व्हेंटीलेटर्स दिनांक 22मे 2021 रोजी प्राप्त झाल आहेत. या संस्थेच्या विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेमध्ये आजतागयत एकुण 202636 व्यक्तींची RT-PCR चाचणी करण्यात आली त्यापैकी 33435 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच या संसथेमध्ये आजतागायत एकुण रॅपिड ॲन्टीजन टेस्ट 10222 करण्यात आल्यसा असुन त्यापैकी 2921 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, असे डॉ देशमुख यांनीी सांगितले.
सद्यस्थितीत म्युकर मायकॉसिस या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने या संस्थेमध्ये स्वतंत्र 30 खाटांचा रुग्णकक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. 31 रुग्णांना म्युकर मायकॉसिस आजार झाल्याचे निदान झाले असुन त्यापैकी 26 रुग्ण या रुग्णालयात दाखल झाले असुन त्यापैकी 13 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच म्युकर मायकॉसिस रुग्णांसाठी ०४ खाटांचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग राखीव ठेवण्यात आला आहे. सदर आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असेलेल्या औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
त्याप्रमाणेच कोविड-19 च्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक ती पूर्व तयारी करण्यात आली असुन बालरोग विभागासाठी स्वतंत्र दोन रुग्णकक्ष तयार करण्याचे प्रस्तावित असुन त्यापैकी 28 खाटांचा एक बालरोग अतिदक्षता विभाग व 32 खाटांचा स्वतंत्र बालरोग कक्ष जुन्या रुग्णकक्षाचे नुतणीकरण करुन् कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यता आला आहे. तसेच त्यासाठी लागणारी आवश्यक ती औषधी, यंत्रसामुग्री व उपकरणांची मागणी करण्यात आली आहे. बालरोग विभागासाठी 15 व्हेंटीलेटर्स प्राप्त झाले असुन आवश्यक ते प्रमाणे स्थापित करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ देशमुख यांनी दिली.
येवु घातलेल्यसा तिस-या लाटेच्या अनुषंगाने सर्व तयारी या संस्थेमध्ये सुरु करण्यात आलेली आहे. कोविड-19 च्या कामकाजासाठी मा. ना. श्री. अमित विलासराव देशमुख वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री, लातुर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहाकार्य लाभले. तसेच मा. श्री. सौरभ विजय सचिव, वैद्यकीय शिक्षण, मा. पदमश्री डॉ. तात्याराव लहाने संचालक, वै. शि., मा. श्री. पृथ्वीराज बी. पी. जिल्हाधिकारी, मा. श्री. अभिनय गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प., मा. श्री. अमन मित्तल आयुक्त, लातुर महानगरपालिका, यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले.
तसेच या संस्थेतील डॉ. शैलेंद्र चौहाण उप अधिष्ठाता कोविड-19 चिकित्सालयीन विभाग, डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक, डॉ. निलिमा देशपांडे विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र, डॉ. अजय ओव्हाळ मुख्य समन्वय अधिकारी, डॉ. महादेव बनसुडे अति. वैद्यकीय अधिक्षक, डॉ. मारुती कराळे नोडल अधिकारी, डॉ. विजय चिंचोलकर प्रभारी, विषाणु संशोध्न व निदान प्रयोगशाळा, डॉ. शिवप्रसाद मुंदडा विभाग्रपमुख बालरोग विभाग, डॉ. विनोद कंदाकुरे विभागप्रमुख कान नाक घसा, श्रीमती अमृता पोहरे अधिसेविका, हे अहोरात्र कामकाज करीत असुन त्यासोबतच या संस्थेतील सर्व डॉक्टर्स, परिचर्या, पॅरामेडीकल, प्रशासकीय कर्मचारी व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी जोमाने काम करीत आहेत, असे डॉक्टर देशमुख यांनी सांगून covid-19 आजारावर या संस्थेच्या मार्फत यशस्वीपणे उपचार केले जात असून पुढील काळातही याच पद्धतीने या संस्थेमार्फत कामकाज केले जाईल याची खात्री दिली.
*********
0 Comments