मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे संस्थापक राजाभाई सुर्यवंशी यांच्या प्रयत्नाने आखेर गुन्हा दाखल
देवणी / प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तलांडी गावात घोरपडे परीवाराला 21तारखेला कुशालबाई नामदेव घोरपडे वय वर्ष 55 या महिलेला गावातील सुवर्ण समाजातील 8 गाव गुंडांनी घरात बळजबरी ने घुसून मारहाण केली होती..
या घटना संदर्भात मास राजाभाई सूर्यवंशी यांना अविनाश भाऊ यांचा कॉल आला व घटने ची सत्यता सांगितली व नंतर पीडित परिवारातील विश्वनाथ घोरपडे यांचा कॉल आला व त्यांच्या घटनेच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली व त्या पीडित महिलेला व त्या परिवारातील राहुल घोरपडे यांना फिर्याद कशी नोंदवावी व कलम कोणती कोणती लावली पाहिजे या बद्दल सातत्याने त्यांना कॉल वरून मार्गदर्शन करत होते.. त्यात घरात बळजबरी ने घुसून मारहाण केल्या मुळे 452 व IPC च्या इतर कलम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात लावा..तुम्ही फक्त माघार घेऊ नका महाराष्ट्रातील समस्त समाज तुमच्या सोबत आहे आणि पोलीस स्टेशनला जा गुन्हा दाखल करा.. घाबरू नका असे त्यांना धीर देत सातत्याने कॉल वरून रात्री 1 वाजता पर्यंत त्यांच्या संपर्कात राहून विचारांना केली असता पीडिताची जबानी झाली आहे.. परंतु PI रात्री नसल्या कारणामुळे FIR ची प्रत देण्यात आली नाही परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी FIR ची प्रत देण्यात आली त्यात घरात बळजबरी ने घुसून मारहाण केल्या मुळे 452 व IPC च्या इतर कलम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला.मातंग अस्मिता संघर्ष या संघटनेच्या माध्यमातून आमदारच्याच मतदार संघात आशा प्रकारच्या घटना घडतात याकडे लक्ष घालावे हि घटना बारीक सारीख नाहीत पण हे घटना संघटनेच्या माध्यमातून उघडपणे जनतेसमोर येत आहे ,
0 Comments