डॉक्टर नीतू मांडके म्हणजे उत्साहाचा धबधबाच
नीतू_मांडके हा मोलाचा माणूस होता मांडकेंना तसे ते असावेत, पण तरीही दीड कोटी माणसांच्या मुंबईत नीतू मांडके एकटे पडले होते का ?
डॉक्टर नीतू मांडके म्हणजे उत्साहाचा धबधबाच होता. ते स्वतः उत्कृष्ट बॉक्सर होते. फूटबॉल टीमचे कप्तान होते. दीर्घ पल्ल्याचे धावपटूही होते. शिवसेना प्रमुखांवर यशस्वीपणे हृदय रोग शस्त्रक्रिया केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे नाव दूरवर पसरले. आणि रुग्णांची त्यांच्याकडे रीघ लागली. हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा होता. दिवसाला १०-१२ शस्त्रक्रिया तर ते अगदी सहजपणे करायचे. त्या काळात शास्त्रक्रियेला पाच सात लाख रुपये खर्च असूनही त्यांची वेटिंग लिस्ट तीन चार महिन्यासाठी फुल्ल असायची. डॉक्टरांच्या हाती आपलं हृदय दिलं तर आपण सुरक्षित घरी परतू हा त्या रुग्णांना विश्वास असायचा. डॉक्टरनी तो सार्थही ठरवला. हजारो शस्त्रक्रिया करूनही एकही रुग्ण कधी टेबलावर दगावला नाही. पण ...
म्हणतात ना दाने दानेपर लिखा है खानेवालेका नाम. २००० मध्ये पुण्याच्या डॉक्टर नीतू मांडके नावाच्या एका मराठी डॉक्टरने आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ केवळ हृदय विकारग्रस्तांसाठी अद्ययावत सामुग्रीनी युक्त आणि आशियातील नंबर एक ठरेल असे २०० कोटींचे १८ मजली महाकाय हॉस्पिटल बांधायला सुरुवात केली. १८ मजले बांधूनही झाले आणि अकस्मात २३ मे २००३ रोजी त्यांचे हृदय विकारानेच अवघ्या ५२ व्या वर्षी निधन झाले. आज तेच हॉस्पिटल अंधेरी चार बंगला येथे "कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल" नावाने दिमाखात उभे आहे, ज्याचे आजचे बाजार मुल्य नक्कीच दोन हजार कोटीहूनही अधिक असेल.
ज्या डॉक्टर नीतू मांडकेनी एक महिन्याच्या बालकापासून ७० वर्षाच्या वृद्धांपर्यंत दहा हजार हृदय शस्त्रक्रिया अगदी सहजपणे करून त्यांना मृत्यू शय्येवरून परत आणून जीवनदान दिलं, ते डॉक्टर नीतू मांडके स्वतः मात्र वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षीच हृदयविकाराने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये स्वर्गवासी व्हावेत हा दैव दुर्विलासच दिवसाला लाखो रुपये कमावत असतानाही डॉक्टरनी माणुसकी कधी सोडली नाही. आर्थिक अडचणी असलेल्या असंख्य लोकांच्या शस्त्रक्रिया त्यांनी अवघ्या साठ सत्तर हजारातही केल्या, जो शस्त्रक्रियेचा निव्वळ खर्च असतो.
डॉक्टर मांडकेना अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले. त्यापैकी महाराष्ट्र गौरव, राजीव गांधी सुवर्ण पदक, इंदिरा गांधी सदभावना पदक, २० व्या शतकातील असामान्य व्यक्तिमत्व, गौरव भारताचा हे उल्लेखनीय पुरस्कार होते. आपल्या हॉस्पिटल मध्ये २० टक्के जागा त्यांनी अडलेल्या लोकांसाठी राखीव ठेवल्या होत्या. आज डॉक्टर नीतू मांडकेही नाहीत, आणि गरीबांविषयी कणव दाखवणारी हॉस्पिटल्स तर शोधूनही सापडणं कठीण. त्याच्या सौ अलका ताई मांडके ह्या त्याचे कार्य पुढे चालवत आहेत .पण आज डॉ आपल्यात नाहीत.........
डॉक्टर नीतू मांडकेंच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली...
संजय केंगार...
0 Comments